Homeक्राईमनात सुनेने मारला सासूच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला कोतवाली पोलिसांनी केला सगळा प्रकार...

नात सुनेने मारला सासूच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला कोतवाली पोलिसांनी केला सगळा प्रकार खुल्ला… ८०,०००/- रु. किं.चे चोरीस गेलेले सोन्याचे दागिण्यासह एक महिला आरोपी कोतवाली पोलीसांनी केली जेरबंद.

advertisement

अहमदनगर दि.२४ जुलै

अहमदनगर शाहरतील नगर दौंड रोड लगत असणाऱ्या हनुमान नगर मधील एका 65 वर्षीय लिलाबाई वाघमारे यांच्या घरातून 22 जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास घरामधील कपटामधून सुमारे 80 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी गेल्याची घटना घडली होती याबाबत लिलाबाई वाघमारे यांनी त्यांची मावस नात सून माया मार्कस तिजोरे हिच्यावर संशय व्यक्त केला होता. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोतवाली पोलीस ठाण्यच्या गुन्हे शोध ब पथकातील पोहेकॉ/शरद गायकवाड, पोना/योगेश भिंगारदिवे, पोकॉ/दिपक रोहकले, पोकॉ/अमोल गाडे, पोकॉ/सुजयराव हिवाळे, पोकॉ सोमनाथ राउत, पोकों तान्हाजी पवार, पोकॉ/ संदीप थोरात, पोकॉ / अभय कदम, पोकॉ/ अतुल काजळे,मपोहेकॉ/कल्पना आरवडे चापोहेकॉ/सतीष भांड व पोकों/प्रशांत बोरुडे या कर्मचाऱ्यांनी संशयीत महिला माया तिजोरे हीचा शोध घेऊन घराची तपासणी केली असता तिच्या घरात लीलाबाई वाघमारे यांच्या घरातून चोरलेल्या ४०,०००/- रु.किचे एक सोन्याचे गंठण त्यामध्ये सोन्याचे मणी व डिझाईनपट्टा असलेले अंदाजे एक तोळा वजनाचे २०,०००/-रु. किचे एक सोन्याचे गंठण त्यामध्ये सोन्याचे मणी व डिझाईन २०,०००/- रु. किचे सोन्याचे मणी असलेली बोरमाळ असा एकूण 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून माया तिजोरे हिला अटक केली आहे.

सदरची कारवाई हि पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. श्री. संपतराव शिंदे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular