अहमदनगर दि.८ सप्टेंबर
इब्टा संघटनेच्यावतीने दिला जाणारा, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार दिव्य मराठीचे रिपोर्टर दीपक कांबळे यांना जाहीर झाला आहे. तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्री फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार संघटनेचे राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहळकर यांनी घोषीत केले. शुक्रवारी (९ सप्टेंबर) श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथे हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
इब्टाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ व्यवहारे म्हणाले,
अहमदनगर स्मशानभूमीतील दूरावस्थेविरोधात दिव्य मराठीत वृत्त मालिका चालवली. या मालिकेचाच भाग म्हणून प्रथमच स्मशानभूमीत लोकप्रतिनिधी व मनपा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सहविचार सभा भरवली. या वृत्तमालिकेची दखल घेत महानगरपालिकेने तत्काळ स्मशान भूमीत नातेवाईकांसाठी शेडची उभारणी केली.
कोरोना कालावधीत, जिल्हा रूग्णालय ते स्मशानभूमी असा मृत्युचा थरारक प्रवास त्यांनी मांडला. या वृत्ताला स्टेट जॉय ऑफ क्रिएशन पुरस्कारही मिळाला होता.
कोरोना कालावधीत सुरक्षेच्या कारणास्तव सारे काही ठप्प असताना, तासन् तास हॉस्पिटल व स्मशानभूमीत जाऊन तेथील वास्तावदर्शी वार्तांकन सुरूच ठेवले. प्रशासकीय दिरंगाईतून जनसामान्यांची होत असलेली हेळसांड परखडपणे लेखणीतून मांडली. शेतकरी आत्महत्येबाबत दिल्या जाणाऱ्या तोकड्या मदतीकडेही लक्ष वेधले. नुकतेच नदीजोड प्रकल्पाच्या दिरंगाईबाबत त्यांचे वार्तांकन सुरू आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन, एकटा संघटनेच्या वतीने पत्रकार कांबळे यांना दिनमंत्रकार पत्रकारिता पुरस्कार प्रदान केला आहे.