अहमदनगर दि.२६ जुलै
अहमदनगर शाहरतील नगर मनमाड रोड वरील झोपडी कॅन्टीन जवळ असणाऱ्या अनिल भोलानाथ जोशी यांच्या मालकीच्या भारत पेट्रोलियम कंपनीचा दिपक पेट्रोलपंप वर मॅनेजर म्हणुन कामावर असणाऱ्या ऑगस्टीन जॉर्ज गोन्सालविस,याने पेट्रोल पंपावरील जमा झालेली रोख
रक्कम ९,९७,३८४/- व कामगारांचे पगाराचे रोख रक्कम ४०,०००/- असा एकुण १०,३७,३८४/- रु. रोख
रक्कमेचा भरणा बॅकेत करणेसाठी दिली होती. ती रक्कम बँकेत न भरता पळवून नेली होती या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, यांना नमुद गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.त्या नुसार स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे, सफौ/राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, सखाराम मोटे, पोना/भिमराज खसे,शंकर चौधरी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे व चापोहेकॉ/ उमाकांत गावडे अशा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे एक पथक म्हणून या गुन्ह्याबाबत तपास सुरू करण्यात आला होता तपास करत असताना या प्रकरणातील आरोपी हा कल्याण येथील अंबरनाथ येथे आपल्या नातेवाईकांकडे असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कळताच स्थानिक गुन्हे शाखेने वेषांतर करून आरोपी ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणी सापळा रचला होता. काही काळानंतर आरोपी त्याच्या नातेवाईकांच्या घरी येत असताना पोलीस पथकाला दिसून आल्यानंतर पोलीस पथक त्याला पकडण्यासाठी जात असताना पोलिसांची चाहूल लागताच आरोपी ऑगस्टीन जॉर्ज गोन्सालविस गाडीवर बसून पळून जाऊ लागला होता मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी पळत जाऊन पाठलाग करून त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.
सादर गुन्ह्यातील काही रक्कम ऑगस्टीन जॉर्ज गोन्सालविस खर्च केली होती व उर्वरित रक्कम रुपये दोन लाख त्याने पोलिसांच्या स्वाधीन केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुढील कारवाईसाठी आरोपीला तोफखाना पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केल्या असून आरोपीवर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, विनयभंग व फसवणुक असे एकुण ०३ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
ऑगस्टीन जॉर्ज गोन्सालविस हा सराईत गुन्हेगार असुन त्याने अशा प्रकारे कोणाची फसवणुक केली असल्यास स्थानिक पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे अवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी केले आहे. सदरची कारवाई मनोज पाटील . सौरभ कूमार अग्रवाल साहेब,अनिल कातकाडे साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले आहे