Homeशहरमाजी नगरसेवक फय्याजोद्दीन शेख यांची हद्दपारी रद्द

माजी नगरसेवक फय्याजोद्दीन शेख यांची हद्दपारी रद्द

advertisement

अहमदनगर दि.७ जून –

अहमदनगर मनपाचे माजी नगसेवक फय्याजोद्दीन शेख यांना अहमदनगर च्या उपविभागीय दंडाधिकारी यांनी अहमदनगर जिल्ह्यामधून २ वर्षांसाठी हद्दपार केले होते. संबंधित आदेशा बाबत फैय्योजददीन शेख यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील दाखल केली. नगर येथील भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनी हद्दपारीचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविला होता. पोलिस अधीक्षकांनी हा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठविला व शेख यांच्यावर विविध खटले भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यामधून हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिले होते.

शेख यांनी या विरोधात विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली.महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१चे कलम ५६(१) (अ) (ब) प्रमाणे प्रकरणात कलम ६० नुसार अपील करण्यात आले. शेख यांच्यावर कोरोना मधील अन्न धान्य वितरणावेळी गुन्हा दाखल झालेला आहे, ते सराईत गुन्हेगार नाहीत. आरोपीपासून समाजाला कुठलाच धोका नाही.आरोपी हे सामाजिक संस्थेमार्फत महिला सबलिकरणाचे काम करत असून,राजकीय वादातून कारवाई करण्यात आली. तसेच त्यांचे वरील सत्र खटला हा गून्हा जुना व न्याय प्रविष्ट आहे. पोलिस यांनी तपासलेले साक्षीदार घटना ठिकाण व तारीख स्पष्ट करत नाहीत. तसेच यास अनुसरुन उच्च न्यायालय मधील न्याय निर्णय चे दाखले दिले. याप्रकारे युक्तीवाद शेख यांचे वकील ॲड.अक्षय कुलट यांनी केला. या प्रकरणाचे कामकाज कामी ॲड.आशिष पोटे यांनी सहकार्य केले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यावर विभागीय आयुक्तांनी हद्दपारी चा उपविभागीय दंडधिकारी यांचा आदेश रद्द केला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular