Homeशहरएकविसाव्या शतकात काळे, गनीभाईचा चमत्कार... १९७७ साली मयत झालेली महिला चक्क ३७...

एकविसाव्या शतकात काळे, गनीभाईचा चमत्कार… १९७७ साली मयत झालेली महिला चक्क ३७ वर्षांनी जिवंत करून दिली जागेची खरेदी…

advertisement

अहिल्यानगर दिनांक 5 ऑगस्ट

अहिल्यानगर शहरात आणि परिसरात ताबे मारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून जागेचे मृत मालक जिवंत असल्याचे दाखवून खरेदी केल्याच्या अनेक घटना दिवसेंदिवस रोजच उघडकीस येत आहेत. याप्रकरणी गुन्हेही दाखल होतात. मात्र मात्र पुढे या गुन्ह्यांचं आणि आरोपींच्या काय होतं याबाबत कळतच नाही अनेक गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत त्यामुळे मूळ मालकाला जागा मिळणे ही कठीण होऊन बसते.

Oplus_131072

असाच एक धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला असून 1972 ते 1975 च्यl सालात मयत झालेल्या एका महिलेने चक्क 2014 मध्ये जिवंत होऊन आपल्या जागेची खरेदी दिली असल्याचा प्रकार समोर आला आहे.मग ती महिला मृत झालीच नव्हती का ? असा सवाल उपस्थितीत होतो आहे. मग तिचा मृत्यूचा दाखला कसा निघाला आणि जिवंत असल्याचा वयाचा दाखलाही निघाला त्यामुळे सगळे गोड बंगाल असून कागदांची हेराफेरी करून खोटी महिला उभी करून मृत महिलेची जागा विकत घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी पोलिस ठाण्यात या जामीन खरेदी विक्री करण्याच्या संशयास्पद प्रवराबाबत तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून. पोलीस दादा तपास करत आहे हे प्रकरण नगर शहराजवळच असलेल्या विळद गावाच्या परिसरात घडले आहे.

या मध्ये मास्टरमाइंड काळे असून गनीभाई याने सर्व कागदपत्र जुळवून आणण्यासाठी काम केले आहे. ससाणे नामक महिला १९७७ साली मयत असताना ती २०१४ साली जिवंत झाली हा चित्रपटाला शोभणारा प्रसंग आहे किंवा याला 21व्या शतकात झालेली जादू म्हणता येईल.काळे, आणि गनीभाई यांनी जादू करून मयत महिलेला जिवंत कसे केले ही एक मोठी रंजनात्मक कहाणी आहे.विशेष म्हणजे ही महिला फक्त जमीन विक्री करण्यासाठी जिवंत झाली होती कारण तिच्या इतर नातेवाईकांना ती 1977 पासून भेटलीच नसल्यची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

विशेष म्हणजे विळद परिसरात अनेक दाखले मिळतात अशी चर्चा असून एखाद्या माणसाची मृत्यू कुठेही झाले तरी या ठिकाणी मयतेचा दाखला मिळतो अशी चर्चा या परिसरात असून हे दाखले कोण तयार करतो आणि कशाप्रकारे तयार केले जातात याबाबतही मोठी माहिती समोर आली आहे.(क्रमशः)

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular