अहिल्यानगर दिनांक 27 सप्टेंबर
नवरात्री हा सण देवीच्या भक्ती साठी आणि स्त्री शक्तीचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो, तसेच महिलांच्या यशाचे महत्त्व सांगतो. या काळात देवी दुर्गाने महिषासुर राक्षसाचा वध करून जगात शांती प्रस्थापित केली, ही कथा महिलांच्या शौर्याचे प्रतीक आहे. यावरून, नवरात्री आपल्याला स्त्री शक्ती आणि तिच्यातील प्रचंड क्षमतेची जाणीव करून देते, जी कोणत्याही अडथळ्यांवर मात करून यश मिळवू शकते त्याचा प्रमाणे अहिल्यानगरच्या शिवमती नंदिनी बाळासाहेब सोनाळे… यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.थोडक्यात त्यांच्या विषयी जाणून घेऊया..

नंदिनी बाळासाहेब सोनाळे यांच्या जीवनात
२००३साला पासुन मराठा सेवा संघ विचारांचा आयुष्यात प्रवेश झाला . त्यांचे पती तालुका स्तरावर संभाजी ब्रिगेडचे काम करत होते.त्यामुळे जिजाऊ ब्रिगेड.मराठा सेवा संघ.यातील पदाधिकार्याचा वैचारिक सहवास त्यांना लाभतं गेला, मराठा सेवा संघ कळत गेला. पुढील काळात २००६ ते २०१० या कालावधीत नंदिनी बाळासाहेब सोनाळे या जमेल तसा सहभाग घेत गेल्या. त्यातूनच पुण्यात असताना १ जानेवारी २००६ मध्ये पुरुषोत्तम खेडेकर यांच्या उपस्थित गंगाधर बनबरे आणि श्रीमंत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष विकास आण्णा पासलकर यांच्या सहकार्याने भुगाव पुणे येथे नंदिनी बाळासाहेब सोनाळे यांचे पती इंजि. बाळासाहेब सोनाळे यांच्या बरोबर मराठा सेवा संघाचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात सहभाग घेतला. त्याच बरोबर सेवा संघाचे पुणे अधिवेशन, खडेकर साहेबांचा निवृत्ती चा कार्यक्रम या सह अनेक वैचारिक कार्यक्रमात नंदिनी बाळासाहेब सोनाळे यांनी सहभाग नोंदवला.आणि यातूनच हाळू हाळु विचारांची बैठक पक्की होत गेली.
नंदिनी बाळासाहेब सोनाळे या २०११ नंतर नोकरी स्थिरस्थावर झाल्याने पुण्यात नोकरी करतांनाही आमच्या मुळ गावी म्हणजे पाथर्डी तालुक्यातील गावपातळीवर राजकारणात त्यांच्या पतिचा सहभाग वाढला. पण मुळ पिंड मराठा सेवा संघाचा असल्याने तालुक्यातील मराठा सेवा संघात सोनाळे पती पत्नीने नविन जोमाने काम सुरु केले .
२०१६ पासुन मराठा सेवा संच आयोजित शिवदुर्ग अभिवादन मोहीम ( पाच दीवस पाच कील्ले, पंचविस मावळे ) हा उपक्रम त्यांचे पती इंजी. बाळासाहेब सोनाळे यांनी चालु केला तो आजही सातत्याने चालु आहे. याची पुर्व तयारी नियोजनात
नंदिनी बाळासाहेब सोनाळे यांचा सक्रीय सहभाग असतो.
खेडेकर साहेबांचा तालुका दौरा झाला आणि त्यांनी ” कुटुंब जोडले तरच समाज जोडता येईल आणि कुटुंब जोडण्यासाठी सहकुटुंब बाहेर पडावे लागेल” हा विचार दिला आणि तो काळजाला भिडला. त्यामुळे सोनाळे पती पत्नीने ठरवले आता सहकुटुंब सुरुवात करु या. त्यातुनच नंदिनी बाळासाहेब सोनाळे यांचे पती बाळासाहेब सोनाळे यांची मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष म्हणून निवड झाली. करोनाची पाहीली लाट संपल्यानंतर तिसगाव येथे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले. हाळु हाळु संपर्क वाढत गेला आणि सहकुटुंब समाजात गेल्यास लवकर समाज आपल्याला स्वीकारतो हा अनुभव आला.
आणि म्हणूनच आता दौघांनी ही पुर्ण ताकदीने जिल्हा पिजुंन काढायचा व मराठा सेवा संघाचे प्रत्येक तालुक्यात किमान शंभर कुंटुब आणि नगर शहरात पाचशे कुटुंब मराठा सेवा संघाला जोडायचे हा निश्चय डोळ्यासमोर ठेऊन नंदिनी सोनाळे यांनी जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षपदी अर्ज भरला. या वेळी जिजाऊ ब्रिगेड च्या प्रदेश कार्याध्यक्ष शिवमती राजश्री ताई शितोळे यांचे मोलाचे मार्गदर्शनसोनाळे यांना झाले. जिजाऊ ब्रिगेड च्या प्रदेश आ़ध्यक्षा शिवमती सिमा ताई , उपाध्यक्ष वर्षाताई माने, आतंरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड कार्याध्यक्ष शिवमती सुजाता ताई ठूबे यांच्यासह सर्व प्रदेश पदाधिकारी यांनी माझ्यावर विश्वास दाखवला व अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदी माझी नियुक्ती सिंदखेडराजा येथे झालेल्या भावदिव्य कार्यक्रमात केली.
जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नंदिनी सोनाळे यांनी आपल्या कामाचा झांजावात सुरू केला.मराठा सेवा संघाचे विचार घराघरात पोहचण्यासाठी व स्त्रीयांना वैचारिक दृष्टिने सक्षम बनविण्यासाठी सोनाळे यांचे काम सुरू असून अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवून काम करत असताना नुकत्याच झालेल्या प्रचंड पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.त्यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनमहाराष्ट्रत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा अशी मागणी करण्यात आली.तर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून विविध संकल्पना राबवून मदत करण्यात येणार असल्याचे नंदिनी सोनाळे यांनी सांगितलेय.
नवरात्रीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांचे दुःख कमी कर त्यांना बळ दे आणि या अस्मानी संकटातून लवकर मुक्त कर हीच मातेच्या चरणी प्रार्थना असल्याचे नंदिनी सोनाळे यांनी सांगितलय..





