Homeराजकारणउपमहापौर ॲड धनंजय जाधव यांची महापालिकेच्या जुन्या कार्यालयास भेट....विविध विभागांच्या कामकाजाची केली...

उपमहापौर ॲड धनंजय जाधव यांची महापालिकेच्या जुन्या कार्यालयास भेट….विविध विभागांच्या कामकाजाची केली पाहणी

advertisement

अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या जुने मनपा कार्यालयास उपमहापौर ॲड. धनंजयभैय्या जाधव यांनी भेट देत तेथील विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी कार्यालयातील प्रशासकीय कामकाज, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती तसेच विभागनिहाय कामकाजाचा आढावा घेतला.

Oplus_0

उपमहापौर जाधव यांनी संबंधित विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कार्यालयीन कामकाजात येणाऱ्या अडचणी, आवश्यक सुविधा तसेच नागरिकांना सेवा देताना भेडसावणाऱ्या समस्या यांची माहिती जाणून घेतली. कर्मचाऱ्यांनीही काही अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी कार्यालय परिसरातील स्वच्छतेचा आढावा घेत असताना काही ठिकाणी अस्वच्छता आढळून आल्याने त्यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना तात्काळ स्वच्छता करण्याच्या तसेच परिसर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या. नागरिक मोठ्या संख्येने या कार्यालयात येत असल्यामुळे परिसर स्वच्छ व सुस्थितीत ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच यावेळी उपमहापौर जाधव यांनी जुने मनपा सभागृहाचीही पाहणी केली. काही वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत हे ऐतिहासिक सभागृह जळून खाक झाले असून सध्या त्याची अवस्था पाहून त्यांनी खंत व्यक्त केली. या ठिकाणी उभे राहून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी आठवणी सांगताना उपमहापौर जाधव म्हणाले की, “लहानपणी मी माझे वडील स्व. कृष्णाभाऊ जाधव यांच्यासोबत या सभागृहात आलो होतो. त्यावेळी या सभागृहात अरुणकाका जगताप, शंकरराव घुले, अभयतात्या आगरकर हे नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते, तर माझे वडील स्व. कृष्णाभाऊ जाधव हे उपनगराध्यक्ष होते. त्या काळात या सभागृहात अनेक मान्यवरांची तेलचित्रे लावलेली होती. आज त्या ठिकाणाची झालेली दुरवस्था पाहून मनाला वेदना होतात.”

या ऐतिहासिक सभागृहाचे जतन होणे गरजेचे असून येथील तेलचित्रे व ऐतिहासिक वारसा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उपमहापौरांच्या या भेटीमुळे जुने मनपा कार्यालय आणि सभागृहाच्या जतनाबाबत सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular