अहिल्यानगर दिनांक 27 जुलै
गोरगरीब जनतेसाठी आलेले रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्री होत असून या साखळीतील मुख्य सूत्रधार कोणाचेच भय न बाळगता रेशनचा माल विकत घेऊन तो पुणे मुंबई पर्यंत पोहोचण्याचा काम सध्या सुरू मार्केट यार्ड परिसरातील कांतीचेंगे याचे कॉल डिटेल्स तपासल्यास मोठा घोटाळा समोर येऊ शकतो.

रेशनचे धान्य काळ्या बाजारात शासकीय ठेकेदाराचे वाहन विशिष्ट हिरव्या रंगाची असतात. हे वाहने गोडाऊन मधून निघाल्यावर कुठे कुठे जाते याचा तपास होणे गरजेचे आहे.
गोडाऊन चा शुभम आणि मार्केट यार्ड मधील कांती चेंगे यांचे कॉल डिटेल्स काढल्यावर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ शकतात. गोरगरिबांचे धान्य कशाप्रकारे आणि कुठे जाते याचे खरे सत्य या कॉल डिटेल्स नंतर समोर येऊ शकते. सर्वसामान्य लोकांचे धान्य पुणे आणि मुंबई येथे विक्रीसाठी घेऊन जाण्यासाठी मोठे साखळी कांती चेंगे याने केली असून. ज्या दुकानदारांकडून माल घेतला जातो त्या दुकानदारांनाही लवकर पैसे न देता माल विकल्यानंतरच पैसे देईल अशी दमदाटी ही कांती चेंगे करत असतो. त्यामुळे कांती चेंगे याला माल विकण्यासाठी अनेक दुकानदार ना खुश असतात. मात्र कांती चेंगे हा नगर शहरा बाहेरील तालुक्यातील दुकानदारांना बरोबर आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून माल घेऊन पुणे,मुंबईला विक्रीसाठी सप्लाय करत असतो. कांती चेंगे आणि त्याच्या साथीदार यांचे मोबाईल डिटेल्स काढल्यावर रेशन काळाबाजार करणारी मोठी साखळी समोर येऊ शकते.





