दिल्ली दिनांक २४ जानेवारी
वक्फ बोर्ड सुधारित बिलासाठी बनविण्यासाठी आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत शुक्रवारी मोठा गदारोळ झाला. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्यामध्ये वादावादी झाल्यानंतर सर्वच विरोधी खासदारांनी आवाज उठवला. त्यामुळे गोंधळ वाढल्याने बैठक काही वेळात स्थगित करावी लागली. सत्ताधारी व विरोधी खासदारांमध्ये वाद वाढल्याने समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी विरोधी पक्षाच्या सर्व दहा खासदारांना समितीतून एक दिवसासाठी निलंबित केले. आता समितीची पुढील बैठक 27 जानेवारीला होणार असल्याचे समजते. निलंबित खासदारांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांचाही समावेश आहे.
संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयकाचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचा भाजप आग्रह धरत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले की, समितीची कार्यवाही एक फार्स आहे. टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी आणि काँग्रेस सदस्य नसीर हुसैन उठून बाहेर गेले. समितीने विरोधी पक्षाच्या 10 खासदारांना एका दिवसासाठी निलंबित केले आहे.