अहमदनगर दि.९ मे
शहरातील लालटाकी रस्त्याला चौथे छत्रपती शिवाजी महाराज नामकरण करावे, अशी मागणी महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांच्याकडे
स्मायलिंग अस्मिता शेतकरी विद्यार्थी संघटनेने कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी केली होती या साठी महापालिका आयुक्तांना मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समितीचे सचिव रिनुल नागवडे,खजिनदार शुभम पांडुळे, ॲड. गणेश शेंडगे, धीरज कुमटकर,प्रदिप चाबुकस्वार, जैद शेख यांनी निवेदन देऊन मागणी केली होती.
छत्रपती चौथे शिवाजी महाराज हे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज याचे वडील होय. त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारला. चौथे शिवाजी महाराजांच्या दुष्काळ निवारण यंत्रणेची दखल थेट ब्रिटिश राणी एलिझाबेथ हिने घेत छत्रपतींचा गौरव केला होता. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी 1914 मध्ये छत्रपती चौथे
शिवाजी महाराज मराठा बोर्डिंग स्कूल सुरू केले. पुढे जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज ही संस्था सुरू झाली. संघर्ष आणि स्वातंत्र्याचे प्रतिक असलेल्या या स्मारकाची ओळख जगाला करून देण्यासाठी चौथे शिवाजी महाराज स्मारक समोरूनजाणाऱ्या रस्त्याला छत्रपती चौथे शिवाजी महाराज मार्गनामकरण करावे, अशी मागणी करण्यात आली होती.
मंगळवारी झालेल्या म्हपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली असून दिल्लीगेट ते पत्रकार चौक या मार्गास छत्रपती चौथे शिवाजी महाराज मार्ग असे नामकरण होणार आहे.