अहमदनगर दिनांक 16 सप्टेंबर
गुरुवारी नगर शहरातील उद्धव ठाकरे गटातील नगरसेवक आणि पदाधिकारी मुंबईला गेले होते मात्र आता या त्यांच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे गटात नाराजी वाढली असून एक गट चांगलाच नाराज झाला आहे.
अहमदनगर शिवसेनेचे पदाधिकारी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी मुंबई येथे जाऊन मातोश्रीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि अहमदनगर शहरातील सर्वच नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला होता.
लवकरच नगर शहरामध्ये एक विराट सभा आयोजित करण्यात येणार असे आश्वासन पक्षप्रमुख उद्धवसाहेब यांनी नगर मधून गेलेल्या पदाधिकारी नगरसेवकांना दिले. नगरशहरात शिवसेना पक्ष आजुन बळकट करण्यासाठी जोरदार तयारीला लागावे असेही उद्धव ठाकरे यांनी भेटण्यास गेलेल्या पदाधिकारी आणि नगरसेवक कार्यकर्त्यांना सांगितले होते.
मात्र आता उद्धव ठाकरे सेनेमधील एक गट नाराज झाला असून या गटाची बैठक नगर शहरातील डाळ मंडई भागात सायंकाळी सात वाजता होणार असल्याची माहिती समजली आहे. काही नगरसेवक पदाधिकारी परस्पर निर्णय घेत असून जुन्या शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नसल्याने ही नाराजी पसरली आहे. मुंबई येथे गेलेल्या नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी पक्षातील इतर सदस्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना या गोष्टीची माहिती दिली नसल्याने शिवसेनेतील एक गट नाराज झाला असून या गटाची बैठक आज सायंकाळी होणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली आहे