अहिल्यानगर दिनांक २० ऑक्टोबर
कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचा खोटा रिपोर्ट बनवला, त्यातही पुढे चुकीचे उपचार दिले. यात रुग्णाचा मृत्यू झाला. हा प्रकार मृत्यूपर्यंत न थांबता, मृताच्या अवयवांची तस्करीसाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल झालेले डॉक्टर अद्यापही अटक नाहीत यामुळे असे काम करणाऱ्यांवर जरब बसणार का? असा सवाल उपस्थित होतोय.

फिर्यादी अशोक खोकराळे पाच वर्षे पाठपुरावा करत होते अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याची दखल घेत, अहिल्यानगर शहरातील पाच नामांकित डाॅक्टारांसह एका अनोळखी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता त्या नंतर अहिल्यानगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात न्युक्लिअस हॉस्पिटलचे डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधीर बोरकर (रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी), डॉ. सचिन पांडुळे, डॉ. अक्षयदीप झावरे, डॉ. मुकुंद तांदळे (सर्व रा. नगर) आणि डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल लॅबचे तज्ञ डॉक्टर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर हा गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. कटकारस्थान, फसवणूक, आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र दोन दिवस झाले तरी आरोपी अद्याप फरार आहेत आरोपी डॉक्टरांना पोलीस कधी पकडणार कारण हा गुन्हा अक्षम्य असून फिर्यादी अशोक खोकराळे यांच्या वडिलांचा मृतदेह पाच वर्ष होऊनही मिळत नसेल तर त्या फिर्यादीला न्याय मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे यासाठी डॉक्टरांना अटक करून मृतदेह नेमका कुठे आहे याचा शोध घेणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान असणार आहे.





