Homeक्राईमगंभीर गुन्ह्यातील आरोपी असलेल्या डॉक्टरांचा तात्पुरता अटकपूर्व जामीन फेटाळला..पुढील सुनावणी 28 ऑक्टोबरला

गंभीर गुन्ह्यातील आरोपी असलेल्या डॉक्टरांचा तात्पुरता अटकपूर्व जामीन फेटाळला..पुढील सुनावणी 28 ऑक्टोबरला

advertisement

अहिल्यानगर दिनांक 21 ऑक्टोबर

साध्या घशाच्या त्रासासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या 79 वर्षीय वृद्धाला करोना पॉझिटिव्ह नसतानाही खोटे रिपोर्ट बनवून चुकीचे उपचार दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर शरिरातील अवयवांची तस्करी करण्यासाठी व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशावरून शनिवारी तोफखाना पोलीस ठाण्यात अहिल्यानगर शहरातील सहा नामांकित डॉक्टरांसह अनोळखी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी डॉक्टर फरार झाले असून. आज पाच डॉक्टरांपैकी दोन डॉक्टरांनी अटकपूर्व दामिनीसाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती.

Oplus_131072

डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधीर बोरकर या दोघांनी सोमवारी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी झाली न्यायमूर्ती एम एच शेख यांच्यासमोर आज सुनावणी घेण्यात आली. या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी हस्तक्षेप अर्ज एडवोकेट पुप्पाल यांच्या मार्फत दाखल केला होता.
तर अशोक खोकराळे यांच्या वतीने एडवोकेट अनिकेत कुल्हाळ ॲड योगेश नेमाने यांनी जवळपास पाऊण तास न्यायालयामध्ये आपली बाजू मांडली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने डॉक्टर बोरकर आणि डॉक्टर बहुरूपी यांचा तात्पुरता आटपुर्व जामीन फेटाळला आहे. पुढील सुनावणी 28 ऑक्टोबरला होणार असून न्यायालयाने पोलिसांना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस काढली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular