अहिल्यानगर दिनांक २६ ऑक्टोबर
कुठलीही वैद्यकीय पदवी अथवा डॉक्टर म्हणून राष्ट्रीय आणि राज्य वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी नाही. तरीही स्वतःला हृदय रोग तज्ञ म्हणून ११ वर्षांपासून रुग्णांच्या आरोग्य आणि जिवाशी खेळ त्या डॉक्टर कडून सुरू असून . त्या डॉक्टरवर कारवाई करावी यासाठी विनंती करणारी याचिका दोन वर्षांपूर्वीच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली होती.त्यावर न्या. नितीन बी. सूर्यवंशी आणि न्या. वैशाली पाटील जाधव यांनी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे चेअरमन यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला. त्यांना २७नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करावयाचे आहे. तालुका वैद्यकीय अधिकायांनी एप्रिल २०२३ रोजी संबंधित डॉक्टरची पदवी आणि इतर माहिती देण्याची विनंती केली होती. आद्यापही ती माहिती पुरविली नाही, महणून खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील विधी शाखेचा विद्यार्थी स्वप्निल गरड याने याचिकेत वरीलप्रमाणे आरोप केला आहे. रूस रशिया येथून जनरल मेडिकल विषयात अभ्यासक्रम पूर्ण केल्याबाबत त्या डॉक्टर बाबत याचिकाकर्त्याला संशय आहे. याचिकाकर्त्याने माहिती अधिकारात सर्व माहिती मिळवली असून यामध्ये त्या डॉक्टरची कुठेही नोंदणी नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
तर अहिल्या नगर शहरात विविध कलमांखाली गंभीर गुन्हे दाखल झालेल्या पाच डॉक्टरांचा अध्यापही तपास लागलेला नाही . अशोक खोकराळे यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या वडिलांचे शव मिळाले नाही तसेच वडिलांच्या शरीरातील अवयव तस्करी झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे, या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, या गंभीर गुन्ह्यातील पाच आरोपी डॉक्टर अद्यापही फरार असून. गुन्हा दाखल होऊन आठ दिवस झाले तरी पोलिसांना डॉक्टर आरोपी मिळून येत नाहीत ही एक मोठी गोष्ट आहे. त्यामुळे पोलिसांचा तपास योग्य रीतीने चालू आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता फिर्यादी अशोक खोकराळे हे सोमवारपासून आंदोलनाला बसणार आहेत तोंडाला काळे फडके बांधून हातात बेड्या घालून जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे अशोक खोकराळे यांनी सांगितले.





