नगर दिनांक 27 ऑगस्ट
नगर शहारातील सावेडी उपनगर मधे पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळाली आहे. लक्ष्मी नगर येथे भटक्या कुत्र्यांच्या टोळीने अचानक एका महिलेवर हल्ला केला. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः महिलेच्या अंगाचे लचके तोडले आहेत.
ही घटना लक्ष्मीनगर मधीलआहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला सकाळी फिरायला जात असतांना. काही भटक्या कुत्र्यांनी मागून येत महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात ती महिला जखमी झाली आहे.
कुत्र्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी त्या महिलेने आरडा ओरड केली मात्र कुत्रे तिथून हलायला तयार नव्हते. ते महिलेच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करीत होते. आरडाओरडा केल्यानंतर काही वेळाने लोक घराबाहेर पडले. त्यानंतर त्या महिलेला कुत्र्यांपासून वाचवण्यात आले. या घटनेमुळे पुन्हा एकदा कुत्र्यांच्या हल्ल्याचा मुद्दा तापला आहे. स्थानिक नागरिकांनी महापालिकेने या भटक्या कुत्र्यांना तत्काळ नियंत्रणात आणण्याची मागणी केली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भटक्या कुत्र्यांचा मुद्दा देशभरात चर्चिला जात आहे. दरवर्षी देशात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांना मृत्यू झाला आहे.
महानगरपालिकेने तातडीने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा महापालिकेच्या आवारात भटकी कुत्री आणून सोडले जाईल असा इशारा माजी नगरसेवक भाजपचे सरचिटणीस निखिल वारे यांनी दिला आहे.
जखमी महिलेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून कुत्र्यांनी महिलेच्या हातांना पायांना मोठ्या प्रमाणात चावा घेतल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे.