Homeशहरश्वान निर्बीजिकरण करणाऱ्या ठेकेदार संस्थेस अदा केलेल्या बिलाचा आकडा पाहून येईल चक्कर......

श्वान निर्बीजिकरण करणाऱ्या ठेकेदार संस्थेस अदा केलेल्या बिलाचा आकडा पाहून येईल चक्कर… अहमदनगर शहरातील खड्डे बुजवण्यासाठी महापालिकडे कडे पैसे नाहीत.. मात्र त्या ठेकेदार संस्थेस अगदी वेळेवर पैसे दिले गेले हे विशेष.. निर्बीजिकरण केलेल्या कुत्र्यांच्या कानावर बिल्ले मारण्याची गरज अथवा ओळख पटवण्यासाठी काहीतरी खुण ठेवण्याची गरज तरच खरा आकडा समोर येऊ शकतो..

advertisement

अहमदनगर दिनांक ११ नोव्हेंबर
अहमदनगर महानगर पालिकेने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पुणे येथील पिपल फॉर अॅनिमल या संस्थेस श्वान निर्बीजिकरण करण्याचा ठेका दिला होता जवळपास 80 लाखांच्यावर या संस्थेत बिल अदा करण्यात आले होते एवढे मोठे बिल अदा करूनही अहमदनगर शहराची परिस्थिती आजही जैसे थे आहे मग हा पैसा कोणाच्या निर्बिजीकरणावर खर्च करण्यात आला आहे. ठिकठिकाणी शहरात कुत्र्यांची पिल्ले होत आहेत. जर आता या संस्थेत पुन्हा ठेका दिला असल्याने ज्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले गेले ते ओळखण्यासाठी त्यांच्या कानांना बिल्ले लावण्याची गरज होती. मात्र तसे केले गेले नाही.मग पुन्हा त्याच संस्थेत ठेका का देण्यात आला या संस्थेला ठेका देऊ नये म्हणून आधी विरोधी झाला होता मात्र नंतर बिन बोभाट या संस्थेला ठेका देण्यात आला हे विशेष याबद्दल सर्वच शांतता का बाळगत आहे याबद्दल आता संशय येऊ लागला आहे.

अहमदनगर शहरातील रस्ते आणि पाणी ही समस्या गंभीर असताना लाखो रुपयांचा खर्च होऊनही हाती काही लागतच नाही या संस्थेबाबत अनेक नगरसेवकांनी आरोपही केले होते मात्र तरीही या संस्थेलाच का ठेका देण्यात आला. या संस्थेने ज्या ठिकाणी निर्बिजीकरण केंद्र उघडले आहे. त्या महानगरपालिकेच्या केंद्रावर जाऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याची गरज आहे. खरच अहमदनगर शहरातील कुत्रे निर्बीजीकरण होतात का ? हे महानगरपालिका प्रशासनाने पाहणे गरजेचे आहे. इतर संस्थांना बिले देण्यासाठी महानगरपालिकेकडे पैसे उपलब्ध नसतात मात्र कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणाऱ्या या संस्थेस वेळोवेळी पैसे दिले गेले हा एक चमत्कारच म्हणावा लागेल अहमदनगर महानगरपालिकेने या संस्थेस दिलेले पैसे कसे दिले आहेत हे पाहिलं तर हा खर्च दर महिन्याला पाच लाख रुपयांच्या आसपास होत असल्याचे दिसून येतोय.

महानगरपालिकेने निर्बिजीकारणासाठी केलेला खर्च खालील प्रमाणे
५/७/२०२१ ते ३१/७/२०२१ प्रती श्वान ९५० प्रमाणे नर २३७ मादी ३६३ एकूण बील ५,७०,०००/-

२/८/२०२१ ते ३१/८/२०२१ प्रती श्वान ९५० प्रमाणे नर २१७ मादी ३५९ एकूण बील ५,४९,१००/-

१/९/२०२१ ते ३०/९/२०२१ प्रती श्वान ९५० प्रमाणे नर २०१ मादी ३८२ एकूण बील ५,५३,८५०/-

१/१०/२०२१ ते ३१/१०/२०२१ प्रती श्वान ९५० प्रमाणे नर ३४९ मादी २४७ एकूण बील ५,६६,२००/-

१/११/२०२१ ते ३०/११/२०२१ प्रती श्वान ९५० प्रमाणे नर ३१२ मादी २३९ एकूण बील ५,२३,४५०/-

१/१२/२०२१ ते ३१/१२/२०२१प्रती श्वान ९५० प्रमाणे नर ३५६ मादी २५८ एकूण बील ५,८३,३००/-

१/१/२०२२ ते ३१/१/२०२२ प्रती श्वान ९५० प्रमाणे नर ३८३मादी २२२ एकूण बील ५,७४,७५०/-

१/२/२०२२ ते २८/२/२०२ प्रती श्वान ९५० प्रमाणे नर ३५५मादी २५६ एकूण बील ५,६८,१००/-

१/३/२०२२ ते ३१/३/२०२२ प्रती श्वान ९५० प्रमाणे नर ३८९मादी २०९ एकूण बील ५,६८,१००

असे नर आणि मादी मिळून ५३३६ निर्बीजिकरण करण्यापोटी ५ जुलै २०२१ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत महानगरपालिकेकडून ठेकेदार कंपनीस जवळपास ५०,६९,२००/- ५० लाख ६९ हजार दोनशे रुपये अदा करण्यात आले होते.
तर
१/४/२०२२ ते ३०/४/२०२२प्रती श्वान ९५० प्रमाणे नर ३४२मादी २६३ एकूण बील ५,७४,७५०/-

१/५/२०२२ ते ३१/५/२०२२प्रती श्वान ९५० प्रमाणे नर ३४०मादी २७० एकूण बील५,७९,५००/-

१/६/२०२२ ते ३०/६/२०२२प्रती श्वान ९५० प्रमाणे नर ३६२मादी २५५ एकूण बील५,८६, १५०/-

१/७/२०२२ ३१/७/२०२२प्रती श्वान ९५० प्रमाणे नर ३२९मादी २५७ एकूण बील४,६१,७००/-

१/८/२०२२ ते ३१/८/२०२२प्रती श्वान ९५० प्रमाणे नर ३८७मादी २०६ एकूण बील५,६३,३५०/-

१/९/२०२२ ते ३०/९/२०२२प्रती श्वान ९५० प्रमाणे नर ३५३मादी २१२ एकूण बील ५,३६,७५०/-

हे बील नर आधी मादी मिळून ३४७६ निर्बीजिकरण करण्यापोटी १ एप्रिल २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत महानगरपालिकेकडून ठेकेदार कंपनीस जवळपास ३३,०२,२००/- ते ३३ लाख दोन हजार दोनशे रुपये अदा करण्यात आले होते.

म्हणजे अहमदनगर महानगरपालिकेने पाच जुलै २०२१ ते ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत जवळपास 8371400 /- 83 लाख 71 हजार चारशे रुपये पिपल फॉर अॅनिमल संस्था, पुणे यांना श्वान निर्बीजिकरण करण्यापोटी अदा केले होते 84 लाख रुपये खर्च करून अहमदनगर शहराची परिस्थिती आज जर पाहिली तर जैसे थे आहे. जर एका वर्षात जवळपास आठ हजार अथवा त्याहून अधिक नर आणि मादी कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले असेल तर या कुत्र्यांना पिल्ले होतात कशी हा एक मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. लाखो रुपये खर्च करून जर हाती काही मिळत नसेल तर महानगरपालिकेने हा वायफळ खर्च जनतेच्या खिशातून का करावा असा सवाल उपस्थित राहतोय. अहमदनगर महानगरपालिकेने या भटक्या कुत्रांमुळे मृत्युमुखी पडलेल्या अथवा कायमस्वरूपी जायबंदी झालेल्या जखमी झालेल्या लोकांना किती मदत केली हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत असला तरी निर्बीजीकरण एवढे पैसे खर्च करून अखेर महानगरपालिकेच्या हाती काही लागले का ? कारण अहमदनगर शहरात ठीक ठिकाणी कुत्र्यांची छोटी छोटी पिल्ले अजूनही आढळून येत आहेत मग निर्बीजीकरण नेमके कोणाचे केले हा एक मिश्किल सवाल आता विचारला जातोय. आता या संस्थे कडून पुन्हा निर्बिजीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ज्या कुत्र्यांची निर्बिजीकरण करण करण्यात आले त्या कुत्र्यांना ओळखण्यासाठी त्यांच्या कानांना बिल्ले मारण्याची गरज आहे तरच ती संस्था किती कुत्र्यांचे निर्बीजीकरण करते हे लक्षात येईल नाहीतर पुन्हा पाहिले पाढे पंचावन्न असेच म्हणावे लागेल.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular