Homeशहरभटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण न करता ठेकेदार संस्थेला पैसे अदा केले जातायेत...

भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण न करता ठेकेदार संस्थेला पैसे अदा केले जातायेत शिवसेनेच्या नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा आरोप

advertisement

अहमदनगर दि.१३ नोव्हेंबर

अहमदनगर महानगरपालिकेने शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचा ठेका दिलेल्या पुणे येथील पीपल फॉर ॲनिमल या संस्थेबाबत आता थेट अहमदनगर महानगर पालिकेवर सत्ताधारी असणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी गंभीर आरोप केल्याने हा ठेका पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्ह आहे.

नगरकरांना चोरांपासून नव्हे तर या भटक्या कुत्र्यांपासून संरक्षण देण्याची वेळ आली असून गल्लोगल्ली कुत्र्यांची फौज रात्रीच्या वेळी उभी असते त्यामुळे नागरिकांना रात्री आणि पहाटे फिरायला जाणे सुद्धा धोक्याचे झाले आहे. कुत्र्यांचे निर्बिजीकरण न करता पैसे उकळले जात असून ज्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले आहे त्याच कुत्र्यांच्या मागे पिल्ले कुठून येतात त्यामुळे हा सर्व आर्थिक घोटाळा असून महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी आणि ठेकेदार संस्था हा घोटाळा करत आहे नगरकर कर रुपी पैसा महानगरपालिकेला देत असताना ही उधळपट्टी कोणाच्या सांगण्यावरून होत आहे असा खोचक सवालही बाळासाहेब बोराटे यांनी केला आहे. या ठेकेदाराचे बिल देऊ नका अन्यथा महानगरपालिकेत कुत्र्यांची पिल्ले सोडली जातील असा इशाराही नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी दिलाय.

तर महानगरपालिकेने ठेका दिलेली संस्था ही बोगस असून ज्या ज्या ठिकाणी ज्या संस्थेने काम केले आहे त्या ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याचा ठपका या संस्थेवर असल्याचा आरोप युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी केला आहे. कुत्र्यांचे निर्बिजीकरण न करता बील काढले जात आहे याला संपूर्ण जबाबदार महानगरपालिकेचे आयुक्त असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच ज्या डॉक्टरच्या देखरेखीखाली हे निर्बिजीकरण होत असते तो डॉक्टरच खोटा असल्याचा दावा माजी नगर सेवक विक्रम राठोड यांनी केला असून जर आपल्या दाव्यात खोटेपणा सिद्ध झाला तर आपल्यावर गुन्हा दाखल करावा असे त्यांनी यावेळी सांगितलेय त्यामुळे हा ठेका आता चांगलाच वादात सापडला आहे. युवा सेनेचे विक्रम राठोड यांनी या ठेकेदाराला मुदतवाढ देऊ नये म्हणून महानगरपालिका प्रशासनाला पत्र देऊनही मनपा प्रशासनाने हा ठेका त्याच संस्थेला पुन्हा दिला असल्याने महानगरपालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनी मिळून नगरकरांना लुटण्याचा धंदा करत असल्याचा आरोप विक्रम राठोड यांनी केला आहे.

इतर शहरातील कुत्र्यांचे अवयव काढून ते महानगरपालिकेत दाखवून त्याद्वारे बिले काढली जात असून ज्या कमिटीच्या देखरेखी खाली ही बिले काढली जाण्याची पद्धत आहे त्या कमिटीसमोर हा सर्व रिपोर्ट जातो का याबाबतही आता चौकशी होणे गरजेचे आहे का महानगरपालिकेत आंधळे दळतेय आणि कुत्र पीठ खातेय असाच काहीसा प्रकार सुरू असल्याचं या सर्व गोष्टींवरून दिसून येतेय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular