HomeUncategorizedकोतवाली पोलिसांनी डॉनची अशी केली खातर जमाई की तो स्वतःला अरशातही ओळखू...

कोतवाली पोलिसांनी डॉनची अशी केली खातर जमाई की तो स्वतःला अरशातही ओळखू शकणार नाही

advertisement

अहमदनगर दि२ मे

पोलिस  नेहमीच टीकेचे धनी होत असतात मात्र त्यांच्या वर्दीच्या आत मध्ये ही एक माणूस नेहमीच पडलेला असतो आणि त्या माणसाचे दर्शन वेळोवळी घडतही असते असेच एक माणुसकीचे दर्शन कोतवाली पोलिसांनी अडवले आहे.

कोतवाली पोलीस स्टेशनच्या गेट मध्ये जाताना येताना कोपऱ्यात रस्त्याच्या कडेला एक काळा कट्ट, अंगावर कपड्यावर कपडे घातलेला केस दाढी वाढलेला माणूस बसलेला असतो येणारे जाणारे त्याला काही न काही खाण्याची वस्तू ठेऊन जात असतात मागील १०-१२ वर्षा पासुन हा वेडसर इसम बसलेला आहे.

कोतवाली पोलीस स्टेशनच्या अवतीभवती फिरुन भिक्षा मागून तो पुन्हा कोतवाली पोलीस स्टेशनच्या मुख्य गेट च्या शेजारी येऊन बसतो हा त्याचा बसण्याचा नेहमीचा अड्डा आहे.

येणाऱ्या जाणाऱ्यांना तो नेहमीच नमस्कार घालत असतो कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनीही या इसमाला अनेक वेळा पाहिले होते.एक उत्सुकता म्हणून त्यांनी सोमवारी सकाळी या इसमा जवळ जाऊन त्याची विचारपूस केली असता त्याच्याशी बोलत असताना त्याचे नाव अब्बास शेख उर्फ डॉन असे सांगीतले तसेच माझे वडील व चुलते हे पोलीस खात्यात नोकरीला होते अशी माहिती त्यांनी पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांनी तात्काळ पोलिस स्टेशनचे काही कर्मचारी आणि शहरातील सामाजिक कार्यकर्ते गुलाम शेख व लालाभाई कुरेशी, जाकीर शेख ( बाँस) अन्सार शेख यांच्याशी संपर्क साधून सदर व्यक्ती हा मुस्लिम समाजाचा असल्याने आणि मुस्लिम समाजाचा पवित्र सण रमजान ईद उद्या किंवा परवा असल्याने या इसमाची दाढी कटिंग करून आंघोळ घालून त्याला नवीन कपडे परिधान करण्यासाठी सहहय करण्यास सांगितले कोतवाली पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अब्बास शेख उर्फ डॉन याला स्वच्छ आंघोळ घालून दाढी कटिंग करून नवीन कपडे परिधान करून आरश्यासमोर उभे केले असता त्यालाही आरशात स्वतःला ही ओळखता आले नाही.

पोलिसांची सेवा भावी वृत्ती आणि माणुसकीचे दर्शन आज कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular