खरं तर अनेक महिला, मुली या आपल्या बदनामी ला घाबरत असतात आणि तसे होऊ नये, या भीतीने त्या तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. पोलिस ठाण्यात न जाता महिला, मुली आपली तक्रार थेट या तक्रार पेटीत टाकून आपले म्हणणे मांडू शकतात.
ज्योती गडकरी – पोलीस निरीक्षक तोफखाना पोलीस स्टेशन
अहमदनगर दि.२० सप्टेंबर :- शहरीकरण वाढले आणि गुन्हे ही वाढले गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असतानाही त्यात महिला व मुलीवरचे अत्याचार ही बाब दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यात शहरात किंवा उपनगरात सध्या महिला वर्ग, लहान मोठया मुलीवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत.
त्यात अलीकडेच काही छेडछाडीच्या घटना नगर शहरात घडून गेल्या आहेत शहरात आशा घटना भविष्यात घडू नयेत किमान गुन्ह्याला आळा व प्रतिबंध होण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील नेतृत्व व संकल्पनेनुसार अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि शहर पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी महिला सुरक्षितता म्हणून शहरात तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या शाळा आणि कॉलेजमध्ये बुधवार पासून मुलींना मार्गदर्शन करणार आहेत तसेच प्रत्येक शाळा आणि कॉलेज मध्ये ज्या ठिकाणी फक्त मुली जाऊ शकतात अशा ठिकाणी तक्रारपेटी लावण्यासंबंधी प्रत्येक कॉलेज आणि शाळांना सूचना करणार आहेत त्याची चावी पोलिसांकडे असणार आहे. तसंच तातडीच्या प्रसंगी ११२ क्रमांकाचा टोल फ्री नंबर देखील मुलींना मदत मिळू शकते तसेच दिलासा पथकाकडूनही मुलींना तातडीची मदत मिळू शकते याबाबत जागृती करण्यासाठी पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी या शाळा कॉलेज मधील विद्यार्थिनींचे प्रबोधन करणार आहेत.
खरं तर अनेक महिला, मुली या आपल्या बदनामी ला घाबरत असतात आणि तसे होऊ नये, या भीतीने त्या तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे त्या कधीकधी मानसिक ताण सहन करतात अर्थातच मुली व महिला आपल्या अत्याचाराविरोधात पुढे येत नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढते आणि यालाच आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली तोफखाना पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.
पोलिस ठाण्यात न जाता महिला, मुली आपली तक्रार थेट या तक्रार पेटीत टाकून आपले म्हणणे मांडू शकतात. आणि तक्रार येताच त्यावर एक स्वतंत्र बिट व त्यातील पोलीस यावर तत्काळ कारवाई करणार असल्याचे पोलीसाकडून सांगण्यात आले आहे. या स्तुत्य उपक्रमाने नक्कीच महिला व मुली सक्षम व बिनधास्त होण्यास मदतच मिळेल