अहमदनगर दि.१५ एप्रिल
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काढलेल्या मिरवणुकी मध्ये आशा टॉकीज चौक येथे घोषणा बाजी करणाऱ्या लोकांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम १४३,१४९,१५३,१५३(अ), ५०५(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून.
कोतवाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी उमेश दगडु शेरकर यांच्या फिर्यादीवरून १)सुनिल मुरलीधर क्षेत्रे २)राकेश रविंद्र वाघमारे ३)मृणाल विलास भिंगारदिवे४)आकाश सुधिर सरोदे ५) सुबोध प्रविण ढोणे ६) प्रशांत पाटोळे ७) सचिन घनश्याम बुंदेले रा. हमालवाडा कलेक्टर ऑफीस जवळ अहमदनग, ७) जयेश लक्ष्मण माघारे रा.दसरे नगर, सिटीलॉन मागे सावेडी अहमदनगर व इतर अज्ञात २० ते २५ कार्यकर्ते तसेच १)कासीम शेख २)मतीन शेख पहीलवान ३)शहा बु-हाण ऊर्फ शानु ४)अब्दुल कादर ५)शहानवाज आस्मा क्रॉकरी वाला व इतर अज्ञात २० ते २५ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल। करण्यात आला आहे.
या प्रकारणी आत्ता पर्यंत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.फरारी आरोपींचा तपास सुरू असून .कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि/ मनोज महाजन तापस करत आहेत