अहमदनगर दि.१५ एप्रिल
अहमदनगर शहरात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरात दिवसभर आज निळे वादळ घोंगावत होते सकाळ पासूनच मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते.
शहराचे आमदार संग्राम जगताप महापौर रोहिणी शेंडगे तसेच स्थायी समितीचे सभापती कुमार वाकळे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
सायंकाळी पाच नंतर आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीस सुरुवात झाली होती बारा मंडळांनी यात सहभाग नोंदववला होता डीजेच्या दणदणाट करत मिरवणूक सुरू झाली होती या मिरवणुकीमध्ये या वर्षी महिलांचा मोठा सहभाग दिसून आला अनेकांनी डीजे समोर ठेका धरलेला दिसला.
आबालवृद्धांसह लहान मुले आणि महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावलेली ही मिरवणूक शांततेत सुरू असताना कापड बाजारा जवळील तेलीखुंट परिसरातून चितळे रोड कडे वळणाऱ्या चौकामध्ये लावलेल्या फलकावर किरकोळ दगडफेक झाल्याने मोठी धावपळ उडाली होती.
या किरकोळ दगडफेक मध्ये तोफखाना कोतवाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे आणि एसआरपीचे काही पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत तर काही नागरिकांनाही सुद्धा याचा फटका बसला असून या दगडफेकीनंतर शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे तसेच तोफखाना पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी तातडीने सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणी पंधरा ते वीस लोकांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे तसेच काही दुचाकी वाहने पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत आहेत पोलीस दगडफेक करणाऱ्या टवाळखोरांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी या घटनेचा इंकार केला असून मिरवणूक सुरळीत सुरू असल्याचा दावा केला होता.