Homeविशेषमरावे परी ‘देह’ अन् ‘अवयव’रुपी उरावे...! साडेनऊ वाजता सुरू होणार अवयवांच्या प्रवासाला...

मरावे परी ‘देह’ अन् ‘अवयव’रुपी उरावे…! साडेनऊ वाजता सुरू होणार अवयवांच्या प्रवासाला सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातील पाहिले अवयवदान खा .सुजय विखे पाटील यांच्या मुळे झाले यशस्वी

advertisement

अहमदनगर दि.१० जुलै

अहमदनगरच्या संगमनेर येथील 25 वर्षांचा तरुण. ज्याचा अपघात झाला. त्यानंतर त्याला संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या अपघातात त्याचे ब्रेन डेड झाले असल्याचे डॉक्टरां च्या निदर्शनास आले त्या नंतर अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याशी त्या पेशंटच्या नातेवाईकांनी संपर्क केला आणि त्या युवकाचे अवयव दान करण्याबाबत इच्छा व्यक्त केल्यानंतर सर्व नातेवाईकांची संमती घेऊन त्या ब्रेन डेड युवकाला डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले आणि आवरदानाची प्रक्रिया करण्यात आली.

त्या युवकाचे लिव्हर, सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथील हॉस्पिटलला घेऊन जाणार असून एक किडनी पुणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये तर दुसरी किडनी नाशिक येथील अपोलो हॉस्पिटल येथील पेशंटवर ट्रान्सफर करण्यात येणार आहे आणि पॅनक्रिया- ज्युपिटर हॉस्पिटल, पुणे येथे करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.पहा व्हिडीओ👇🏽

अहमदनगर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असून जिवंत लिव्हर आणि दोन किडण्या अहमदनगर जिल्ह्यातून पुणे आणि नाशिक या ठिकाणी प्रवास करणार आहेत यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज झाली असून बरोबर साडेनऊच्या ठोक्याला या अवयवांचा प्रवास नगर मधून सुरू होणार आहे.

सदर अवयवदान होण्यासाठी या सर्व प्रक्रियेत पुणे येथील प्रसिद्ध प्रत्यारोपण सर्जन डॉ. बिपिन विभुते यांच्यासमवेत डॉ. मनीष प्रसाद पाठक(भूलतज्ञ), डॉ. संदिप नळे(भूलतज), डॉ. राहुल मामडे(भूलतज्ञ), डॉ. आनंद काशीद(युरॉलॉजिस्ट), डॉ. हर्षवर्धन तनवार( युरॉलॉजिस्ट), डॉ.साई प्रसाद शिंदे(नेफ्रोलॉजिस्ट) सौ. आरती गोखले यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular