अहिल्यानगर
‘समांतर रंगभूमी’ हा मराठी रंगभूमीचा एक महत्त्वाचा प्रवाह झालेला आहे. समांतर रंगभूमी म्हणजे व्यावसायिक रंगभूमीला समांतर असा एक प्रकार, जो सामाजिक आणि कलात्मक दृष्ट्या अधिक संवेदनशील आणि विचारप्रवर्तक अशी नाटके सादर करतो.

व्यावसायिक आणि समांतर रंगभूमीवर काम करणाऱ्या असंख्य संस्था आणि कलावंत महाराष्ट्रात आहेत, ज्यांनी नाटकांच्या आणि एकांकिकांच्या माध्यमातून या प्रवाहामध्ये भरीव योगदान दिले आहे.
समांतर रंगभूमी ही एक अशी चळवळ आहे, जी अनेक कलावंत, लेखक आणि दिग्दर्शक यांना एकत्र आणते. त्यांच्या कार्यामुळे मराठी रंगभूमीला एक वेगळी आणि महत्त्वपूर्ण दिशा मिळालेली आहे.
गेली जवळपास चाळीस वर्षे नगरच्या नाट्य क्षेत्रात झपाटल्या सारखे काम करणाऱ्या आणि नगरच्या नाट्य कलाकारांचा डंका महाराष्ट्रभर वाजवणाऱ्या प्रा.डाॅ.श्याम शिंदे यांची “समांतर रंगभूमी कलावंत संघटने” च्या ‘मध्यवर्ती संस्थापक अध्यक्ष पदी” नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांची निवड झाल्याने त्यांचे रंगकर्मी,सरगमप्रेमी मित्र मंडळ यांच्यासह शहरातील विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.





