अहिल्यानगर दिनांक २० सप्टेंबर
अहिल्यानगर महापालिकेच्या आरोग्य विभागातील अपहार प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातून निलंबित वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांचे नाव वगळण्याचा आदेश मुख्य जिल्हा न्यायाधीश अंजु शेंडे यांनी दिला आहे.

आरोग्य विभागात १६.५० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी डॉ. बोरगे यांच्यासह कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपास करून कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी डॉ. बोरगे यांचा गुन्ह्यात सहभाग आढळत नसल्याचा अहवाल कनिष्ठ न्यायालयात दाखल केला होता. तो फेटाळण्यात आला होता. त्या विरोधात डॉ. बोरगे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात पुणरीक्षण अर्ज दाखल केला होता. तो मंजूर करण्यात येऊन डॉ. बोरगे यांचे नाव त्या गुन्ह्यातून वगळण्याचा आदेश देण्यात आला. त्यांच्यावतीने ऍड. सुधीर बाफना यांनी काम पाहिले.





