Homeशहरदैनिक लोकआवाजचे दणदणीत पुनरागमन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते...

दैनिक लोकआवाजचे दणदणीत पुनरागमन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

advertisement

अहमदनगर दि.१९ नोव्हेंबर  :

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज दैनिक लोकआवाजच्याबदलते नगर‘ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. आजपासून दैनिक लोकआवाजची नवी आवृत्ती पुन्हा नव्या रूपात व नव्या व्यवस्थापनाखाली वाचकसेवेत दाखल झाली. त्यानिमित्त काढण्यात आलेल्या विशेषांकाचे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विशेष कौतुक केले.

  1. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज नगर दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते आज नगरच्या बहुचर्चित उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा झाला. त्यानिमित्त नगरमधील शिल्पा गार्डन येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात आज दैनिक लोकआवाजच्या नव्या आवृत्तीचे मंत्री गडकरी यांनी लोकार्पण केले. यावेळी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील, शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आमदार संग्रामभैय्या जगताप, आमदार बबनराव पाचपुते, आमदार राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष महेंद्रभैया गंधे, दैनिक लोकआवाजने मुख्य संपादक विठ्ठल लांडगे यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

‘लोकआवाज’चे कौतुक आणि अपेक्षा
महसूलमंत्री विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील तसेच आमदार संग्राम जगताप यांनीही लोकआवाजच्या अंकाच्या नव्या रचनेचे कौतुक केले. दरम्यान, आज जिल्हाभर दैनिक लोकआवाजच्या नव्या आवृत्तीची वाचक व विक्रेत्यांमध्ये चर्चा रंगली. सध्याच्या काळात वर्तमानपत्र कसे असावे, याचे दैनिक लोकआवाजची नवी आवृत्ती छान उदाहरण असल्याची प्रतिक्रिया उमटली. भल्या सकाळीच आज काही ठिकाणी वाचकांनी देखील दैनिक लोकआवाजचे स्वागत केले. दैनिक लोकआवाजच्या आजच्या अंकासोबत देण्यात आलेल्या ‘बदलते नगर’ विशेषांकाचेही खास कौतुक करण्यात आले. या विशेषांकातील नगर आणि शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांच्या राजकीय भविष्याचा येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला वेध वाचकांना विशेष भावला. तशा प्रतिक्रिया अनेकांनी आवर्जून दैनिक लोकआवाजला कळवल्या.
लोकार्पण झालेल्या उड्डाणपुलाच्या अनुषंगाने शहर आणि जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून निघण्याची अपेक्षा व्यक्त करत, आतापर्यंतच्या आणि होऊ घातलेल्या विकासाचा थोडक्यात आढावा आजच्या दैनिक लोकआवाजमध्ये घेण्यात आला. त्याचेही वाचकांनी कौतुक केले. या विषयावर आणखी प्रकाश टाकावा अशी अपेक्षाही काही वाचकांनी व्यक्त केली.

शहरातील आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था, वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचाराचे पेव फुटल्यासारखी निर्माण झालेली स्थिती, या आणि सामान्य नागरिकांशी थेट संबंध असणाऱ्या अशा विविध विषयांवर दैनिक लोकआवाजने गेल्या दोन-अडीच महिन्यांत लोकांचा आवाज बुलंद केल्याची भावना काही जणांनी प्रत्यक्ष भेटीत व्यक्त केली. यात काही राजकीय पुढारी, काही शासकीय व पोलिस खात्यातील अधिकारी आणि न्यायव्यवस्थेशी संबंधित व्यक्तींचाही समावेश होता. अशा विषयांवर आम्हाला थेट व्यक्त होता येत नाही, पण दैनिक लोकआवाज आमचाच आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असल्याबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. दैनिक लोकआवाजला त्यामुळे बळ मिळाले असून, आजच्या औपचारिक लोकार्पणानंतर लोकांचा आवाज बुलंद करणार असल्याची खात्री याच वाचकांनी आणि समाजधुरिणांनी व्यक्त केली.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular