अहिल्यानगर दिनांक 9 नोव्हेंबर
अहिल्यानगर मध्ये सध्या बनावट मालक उभे करून जमीन खरेदीचे अनेक प्रकार सध्या सर्रास सुरू आहेत पाईपलाईन रोड सावळी नाका या भागातही काही दिवसांपूर्वी बनावट मालक उभे करून जागा खरेदी करून ताबा मारण्याचे प्रकार घडले आहेत. याबाबत लवकरच सविस्तर माहिती समोर येणार असून त्या पूर्वी निंबळक परिसरात असणाऱ्या एका जागे बाबत डॉक्टरची मोठी फसवणूक झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी तब्बल 30 आरोपी सामील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नगर शहरातील एका नामांकित डॉक्टरला जवळपास 14 कोटी 66 लाख 51 हजार रुपयांना एका टोळीने फसवले असून 2017 ते 2021 या काळात डॉक्टर करून वेळोवेळी 14 कोटी रुपये जागेच्या व्यवहारापोटी घेण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात डॉ .सुर्यभान आठरे पाटील यांच्या फिर्यादी वरुण भाजपचा माजी नगरसेवक स्वप्नील रोहीदास शिंदे ,
सचिन रोहीदास शिंदे ,वैशाली स्वामी , मिनल स्वामी ,अमोल बबन जाधव , भाऊसाहेब नवृत्ती नागदे , चंद्रशेखर हरिभऊ शिंदे , सिराज पूर्ण नाव माहित नाही ,दत्तु सस्ते , श्रीकांत आल्हाट,रॉकी सुदाम कांबळे, सुनिल बाळु देसाई ,अनिल बाळु देसाई , सुमन बाळु देसाई , ज्योती राजु कांबळे , प्रशांत प्रभाकर गायकवाड , महेश नारायण कु-हे , गणेश तकडे ,गणेश रविंद्र साबळे , लखण बबन भोसले , विजय नाथा वैरागर ,भारत यल्लप्पा फुलमाळी, रामा गंगाधर पवार, प्रेमचंद होनचंद कांबळे , सुनिल नाथा वैरागर , संतोष नामदेव कदम , साजीद रहेमुद्दीन शेख ,संजय बाजीराव आल्हाट, इलर आनोळखी साथीदार यांच्या विरोधात
भारतीय संहिता कलम गुन्हा. रजि. 420,417,465,466,467,468,471,406,34,120 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निंबळक गावचे शिवारात गट नंबर- 04. मधील जमीन डॉक्टर आठरे यांना देण्याच्या बहाण्यातून या टोळीने बनावट कागदपत्रे, बनावट मिळकती, बनावट मालक, बनावट सह्या, बनावट लोक उन्ने करुनू बनावट पावत्या ज्या मैल्यवान आहेत व जे खोटे आहे अशी माहीती असुन सुध्दा जानुन बुजुन पैसे मिळवीण्यासाठी सदरील पावत्या व कागदपत्रे व दस्त हस्तांतरीत करुन फिर्यादी यांची 14 कोटी 66 लाख 51,000 रुपयाची फसवणुक केली वगैरे मजकुराच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे सावळी भागातही काही दिवसांपूर्वी अशीच एक खरेदी झाली असून बराबर दस्तऐवज तयार करून खरेदी विक्री झाली आहे. यामध्ये मूळ मालक बाजूलाच राहिला असून बनावट कागदपत्रांद्वारे खरेदी विक्री झालेली आहे यामध्ये नेहमीच नगर शहरातील ती टोळी सक्रिय झाली असून जवळपास तीन ते चार बनावट खरेदी झाल्याची माहिती समोर आली आहे.





