अहिल्यानगर दिनांक ४ ऑगस्ट
प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी १७/०६/२०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैद्य धंदे बंद करण्यासाठी विशेष पथक स्थापन करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पथकाने ५८ गुन्हे दाखल करुन ५,९७,०३,२६३ /- रुपये मुद्देमालासह २६९ आरोपी अटक केले होते. विशेष म्हणजे त्यांच्या पोलीस पथकामध्ये जिल्ह्यातीलच जुने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्याबरोबर छापा टाकण्यासाठी जात होते. एक महिन्यात एवढी मोठी कारवाई करून संतोष खाडे यांनी अहिल्यानगरकरांच्या मनात एक विशेष स्थान बनवले होते.

जे धंदे खुलेआम सुरू होते अनेक रस्त्याच्या कडेला असणारे अवैध दारू विक्री करणारे हॉटेल जे उत्पादन शुल्क विभागाला कधीच दिसत नव्हते. रस्त्याच्या कडेला मटक्याच्या टपऱ्या होत्या त्या स्थानिक पोलिसांना कधीच दिसत नव्हत्या. महसूल अधिकाऱ्यांना वाळूचे डंपर कधीच दिसत नव्हते.मावा,गुटखा विकणारे कधीच अन्न औषध प्रशासन आणि पोलिसांना दिसत नव्हते. हे सर्व खुल्या सुरू असूनही कधीच मोठ्या प्रमाणात छापे झाले नाहीत मात्र प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी एका महिन्यात लाखो रुपयांचा मुद्देमाल आणि शेकडो आरोपी पकडून एक विक्रम बनवला मात्र खाडे दुसरीकडे प्रशिक्षणासाठी निघून गेले आणि पुन्हा एकदा सर्व काही अलबेल असल्यासारखे सर्व अवैध्य धंदे सुरळीत सुरू झाले आहेत.
स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकारी स्थानिक पातळीवर अवैध धंद्यांवर कारवाई करीत नाही. केली तरी ती जुजाबी कारवाई असते.अहिल्यानगर शहरात माव्यामध्ये कोट्यवधीची उलाढाल आहे. अहिल्यानगरचा मावा थेट पुणे मुंबई आणि मराठवाड्यापर्यंत पोहोचला आहे. विशेष मध्ये पुण्यामध्ये तर काही ठिकाणी नगरचा मावा मिळेल अशा पाट्याही लागलेल्या दिसतात यावरून नगरचा मावा किती प्रसिद्ध असेल याची प्रचिती येते.
अहिल्यानगरच्या मावळचा प्रश्न थेट विधानसभेतही गाजला होता. श्रीगोंदा चे आमदार विक्रम पाचपुते यांनी हा प्रश्न मांडला होता. अन्न व औषध प्रशासनाचा
तर या मावा आणि गुटखा विकणाऱ्यांवर कधीच धाक नव्हता किंवा त्यांनी स्वतःहून कधीच एकही कारवाई केलेली लक्षात येण्याजोगी नाही.पोलिसांनी छापा टाकल्यानंतरच अन्न औषध प्रशासन जागे होते ही नेहमीचीच बोंब आहे.
प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे बदलून गेले मात्र त्यांच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचारी आयले नगरमध्येच आहेत आजही ते काम करत आहेत मग पुन्हा एकदा अवैध धंदे सुरू होण्याचे कारण काय ? स्थानिक पोलिसांनी याबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. एखादा नवखा अधिकारी येऊन अवैधंदे शोधून कारवाई करतो मात्र स्थानिक पोलीस वर्षं वर्ष याच ठिकाणी असूनही काहीच करू शकत नाही ही शरमेची बाब आहे. खाडेंसारखे अधिकारी प्रत्येक जिल्ह्यात हवेच तरच कुठेतरी पोलीस आणि सामान्य नागरिक यांच्यासाठी चांगले दिवस येतील.
अहिल्या नगर जिल्ह्यात काही दिवसांपासून चोरांचे सत्र जोरात सुरू आहे चार चाकी वाहने चोरून नेण्याचे प्रमाण वाढत असून सीसीटीव्ही मध्ये चोरटे स्पष्टपणे दिसत असूनही पोलीस कारवाई करत नाही आरोपी पकडला तरी मुद्देमाल मिळत नाही अशी अनेक उदाहरणे सध्या नगर जिल्ह्यात समोर येत असल्यामुळे पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. अहिल्यानगर शहरात एका दिवसात बाजारपेठेमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला त्यामुळे व्यापारी भयभीत झाले आहेत. सर्वसामान्य जनता नेहमीच जीव मुठीत घेऊन जगत असते नगर शहरात आत्ताच काही दिवसांपूर्वी बागरोजा हडको परिसरात एका टोळक्याने धुमाकूळ घातला होता त्याचे सीसीटीव्ही पाहून इतर नागरिकही घाबरून गेले आहेत. मात्र आरोपींवर कारवाई झाली नाही तर सर्वसामान्य जनता भयभीत होते. त्याला कुठेतरी आधार देण्यासाठी पोलीस प्रशासनाने खंबीर भूमिका घेणे गरजेचे असते मात्र पोलिसांच्याच कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न उभा राहतो.