मुंबई दि.१० नोव्हेंबर
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची तलवार पुन्हा भारतात आणि महाराष्ट्रात आणावी याकरता अनेक वेळा मागणी झाली मात्र अद्यापही ही तलवार लंडन मध्ये संग्रहालयात आहे.
याआधी ही तलवार आणण्यासाठी महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले होते. त्यांची महाराणीशी बैठक ठरली होती. मात्र, ती बैठक झालीच नाही.तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न करणारे हे मुख्यमंत्री होते ए.आर. अंतुले या बैठकीच्या आधीच त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर मुख्यमंत्रीपदावर बसलेले बाबासाहेब भोसले हे राणीशी चर्चा करण्यासाठी गेलेच नाही. ही चर्चा पुढे गेली असती, तर तलवार कदाचित महाराष्ट्रात परत आली असती.
त्यानंतर अनेक मुख्यमंत्री आणि राज्यातील मोठ मोठ्या राजकीय नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार परत मिळावी यासाठी प्रयत्न केले होते मात्र याला अद्यापही यश आलेले नाही मात्र आता पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार महाराष्ट्रात आणणार अशी घोषणा संस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली असून या संदर्भातला पत्रव्यवहार संस्कृती विभागामार्फत केंद्र सरकारकडे सुरू असून आणि ऋषी सुनक(Rishi Sunak) ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना तलवार परत मिळवण्याबाबत विनंती केली जाणार आहे. इंग्रजही तलावर घेऊन गेले होते. जगातील सर्व संपत्ती पेक्षा ही तलावर अमूल्य आहे. ऋषी सुनक यांच्याशी ही या संदर्भामध्ये चर्चा करून ही तलवार महाराष्ट्र मध्ये परत यावी यादृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत अशी माहिती सुधीर मूलगंटीवार यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ही इतिहासाची साक्षिदार आहे. सध्या ही तलवार ब्रिटनमध्ये आहे. ही तलवार परत भारतात आणण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार विशेष प्रयत्न करत आहे. शिवराज्यभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याआधी ही तलवार महाराष्ट्रात परत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.