Homeशहरनाशिक पदवीधर मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार अॅड. धनंजय जाधव यांना भारतीय जनता पार्टी...

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार अॅड. धनंजय जाधव यांना भारतीय जनता पार्टी ने उमेदवारी दिल्यास स्वाभिमानी शिक्षक संघटनेचा पाठिंबा-प्रसाद शिंदे

advertisement

अहमदनगर दि.५ जानेवारी
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून अद्याप या निवडणुकीला याच्यावर शिक्का मुहूर्त झाले नसले तरी भारतीय जनता पक्षाने आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी अहमदनगर शहरातील माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी पक्षाकडे केली असून त्यानंतर धनंजय जाधव यांना सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे.

या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने धनंजय जाधव यांना उमेदवारी दिली तर स्वाभिमानी शिक्षक संघटनेचा जाहीर पाठिंबा असेन. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परंपरेतील उमेदवार म्हणून ॲड.धनंजय जाधव हे बहुजन, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला इत्यादी पदवीधरांचे प्रश्न चांगल्या पध्दतीने सोडवतील अशी आशा आहे तसेच भारतीय जनता पक्षाने अॅड. धनंजय जाधव यांना नाशिक पदवीधर मतदार संघाची उमेदवार दिल्यास स्वाभिमानी शिक्षक संघटना त्यांच्या विजयासाठी अहोरात्र प्रयत्न करेल असे प्रतिपादन स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी केले.

धनंजय जाधव यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कार्यकर्ते केलेली कामे आणि त्यानंतर समाजकार्यातून सुरू असलेली त्यांच्या कामामुळे त्यांचा संबंध सर्वच पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांसह सर्व घटकातील नागरिकांशी त्यांची नाळ जुळलेली आहे उच्चशिक्षित आणि युवा उमेदवार म्हणून जर भारतीय जनता पक्षाने धनंजय जाधव यांना उमेदवारी दिल्यास निश्चितच सर्व गोष्टींचा फायदा भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो आणि अनेक वर्षांपासून काँग्रेसकडे असलेली ही जागा भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात पडू शकते

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular