अहिल्यानगर दिनांक 20 ऑक्टोबर
महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना अखेर आज प्रसिद्ध झाली अनेक दिवसांपासून अंतिम प्रभाग रचना कधी जाहीर होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ९ ते १३ ऑक्टोबर अशी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याची मुदत होती मात्र तेरा तारीख उलटूनही अंतिम प्रभाग रचना जाहीर होत नसल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात अखेर आज ती प्रसिद्ध झाली.

पूर्वी निश्चित केलेल्या प्रभाग सीमांमध्ये मोठे फेरबदल करून विशेषतः प्रभाग क्रमांक ९, १५ आणि १६ मध्ये तोडफोड करण्यात आली आहे. या रचनेत स्थानिक नेत्यांना अनुकूल असा प्रभाग तयार करण्यात आल्याने सामान्य नागरिकांवर अन्याय झाल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी स्पष्ट केले. या भागात शिवसेना शिंदे गटाचे दोन माजी महापौर आणि नगरसेवक आहेत. त्यांना अनुकूल हा प्रभाग व्हावा अशी रचना करण्यात आली असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. तसेच आरक्षण तसेच ठेवले तर ही गोष्ट मतदारांवर अन्यायकारक असणारी असल्याचाही जाधव यांनी स्पष्ट केल आहे.





