Homeराजकारणनाराज मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला मुख्यमंत्र्यांसमोर "हा" प्रस्ताव

नाराज मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला मुख्यमंत्र्यांसमोर “हा” प्रस्ताव

advertisement

मुंबई दि.२१ जून

शिवसेनेचे नाराज मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला असून भाजपसोबत सरकार स्थापन करा तसेच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद द्यावे असा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेना नेते संजय राठोड प्रस्ताव घेऊन वर्षा बंगल्यावर पोहोचले असून याबाबत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उर्वरित आमदारांशी चर्चा करून काय निर्णय घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

भाजप सोबत जर आले तर आम्ही सर्व जण शिवसेनेतच राहू याबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावा अन्यथा एकनाथ शिंदे संध्याकाळी पुढची भूमिका स्पष्ट करतील असही सेना नेत्यांनी सांगितले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular

05:40