नगर दि.६ ऑक्टो –
काँग्रेस पक्ष्याच्या वतीने दक्षिण लोकसभा मतदार संघातील 6 विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारीच्या मुलाखती पक्ष निरीक्षक आमदार मुजफ्फर हुसेन व जिल्हाअध्यक्ष जयंत वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आल्या.यावेळी मंगल भुजबळ यांनी निरीक्षक हुसेन स यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच अहमदनगर शहर विधानसभेसाठी त्यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये मुलाखत दिली.
नगर शहरातून आजपर्यंत कोणत्याही पक्षाने महिलांना विधानसभेला उमेदवारी दिली नाही त्यामुळे काँग्रेस पक्षाने हीच संधी साधत पहिल्यांदा महिलेला उमेदवारी दिल्यास शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिला खुश होऊन आपल्या एका लाडक्या बहिणीला तिकीट मिळाले म्हणून तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहतील तसेच इतर सर्व महिला वर्ग यांना देखील पहिल्यांदाचं महिलेला उमेदवारी मिळाली याचा आनंद होईल, काँग्रेसने लोकसभेला 4 महिलांना उमेदवारी दिली होती आणि त्या चारही महिला लोकसभेला निवडून येऊन खासदार बनल्या म्हणजेच महिलांना उमेदवारी दिली तर त्याचा निकाल 100 टक्के सकारात्मक येतो हा अनुभव काँग्रेसला आहेच त्यामुळे काँग्रेस पक्ष विधानसभेला सुद्धा महिलांना आरक्षण देणार आहे असे वरिष्ठ पातळीवर बोलले जाते पण हे सिद्ध करायचे असेल तर याची सुरुवात नगर शहरातूनच करावी त्यासाठी सर्वप्रथम नगर शहराची जागा काँग्रेसने कसल्याही परिस्थिती मध्ये महाविकास आघाडीत काँग्रेसला घेऊन लढवावीचं अशी आग्रही भूमिका यावेळी भुजबळ यांनी घेतली.
यावेळी मंगल भुजबळ यांनी त्यांच्या कामाचा अहवाल निरीक्षक यांना दाखवून आपले कामच असे आहे की,आपल्याला उमेदवारी दया अशी म्हणण्याची वेळ माझ्या समर्थकांवर येतच नाही कारण शेवटी आपलं कामचं बोलते, घोषणाबाजी नाही त्यामुळे कामाला प्राधान्य दिले पाहिजे असेही त्यांनी आवर्जून सांगितले.यावेळी नगर शहरातील जातीय समीकरण कसे व किती आहे आणि ते काँग्रेसला कसे पोषक आहे याची सविस्तर माहिती व इतरही आवश्यक ती माहिती त्यांनी निरीक्षक हुसेन साहेबांना देऊन नगर शहरात 60 टक्के असलेला ओबीसी समाज यावेळी ज्या ओबीसी उमेदवाराला पक्ष तिकीट देईल त्याच्याच पारड्यात मत टाकतील अशी सध्या परिस्थिती आहे त्यामुळे ही संधी काँग्रेसने सोडू नये व याच माध्यमातुन काँग्रेसने ओबीसीला न्याय दयावा अशी आक्रमक भूमिका सुद्धा यावेळी भुजबळ यांनी मांडली.
काँग्रेसने मध्यंतरी जो विधानसभा सर्व्ह केला त्यात नगर शहरात काँग्रेसला पोषक वातावरण असल्याचे त्यांनी निरीक्षक यांच्या निदर्शनास आणुन दिले.त्यामुळे उमेदवार कोण हे नंतर ठरवू आधी जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला ताब्यात घ्या जागा काँग्रेसला मिळाल्यास पक्ष श्रेष्टी ज्याला उमेदवारी देतील ती सर्वाना मान्य असेल व आम्ही सर्वजण मिळून ही जागा यावेळी नक्कीच जिंकूनच दाखवू असा ठाम विश्वास त्यांनी त्यांच्या मुलाखतीद्वारे निरीक्षक हुसेन यांना दिला.. यावेळी जिल्हाअध्यक्ष जयंत वाघ व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते…