मुंबई दिनांक १५ डिसेंबर
महागनरपालिका निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होईल, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत. ही निवडणूक ईव्हीएमवर होणार असून उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. महानगरपालिका निवडणुकांसाठी 39147 मतदान केंद्र असणार आहेत. यातील 10,118 मतदान केंद्र बीएमसीसाठी असतील. तर कंट्रोल युनीट 11,349 आणि बॅलेट युनीट 22000 असणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.

महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम
नामनिर्देशन स्वीकारण्याचा कालावधी 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 नामनिर्देशन पत्राची छाननी 31 डिसेंबर, 2025 2 जानेवारी, उमेदवारी माघाराची मुदत 2026 निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी – 3 जानेवारी, 2026 मतदानाची तारीख – 15 जानेवारी, 2026 मतमोजणी – 16 जानेवारी, 2026