Homeशहरअरे थांबा आता..किती खोट बोलणार... मतदार राजा सर्वकाही जाणतो... रील, प्रचार पत्रक...

अरे थांबा आता..किती खोट बोलणार… मतदार राजा सर्वकाही जाणतो… रील, प्रचार पत्रक आणि कॅलेंडरच्या माध्यमातून इच्छुक उमेदवार घराघरात पोहोचत असताना दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न…

advertisement

अहिल्यानगर दिनांक 22 डिसेंबर

महानगरपालिकेच्या निवडणुकीची धूम सध्या जोरात सुरू असून निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसे सर्वच पक्षांतील इच्छुक उमेदवार प्रचार पत्रकाद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाचे उमेदवार फिक्स झाले नसल्याने तिकीट आपल्यालाच मिळेल या आशेने अनेक उमेदवार सध्या सोशल मीडियावर जाहीर प्रचार करत आहेत. तर नवीन वर्ष येत असल्याने अनेक उमेदवारांनी आता कॅलेंडर ही छापले आहेत त्या माध्यमातून जनतेसमोर जाताना प्रभागात झालेल्या विकास कामांची यादी कॅलेंडरच्या माध्यमातून टाकण्यात येत आहे. मात्र अनेक ठिकाणी काम दुसऱ्याने केले आणि श्रेय तिसरा घेतोय अशी परिस्थिती या प्रसिद्ध पत्रकाच्या माध्यमातून मतदारांना वाचायला मिळत आहे.

Oplus_131072

अनेक लोक पाच वर्ष गायब होते मात्र आता निवडणूक जवळ आल्यामुळे अनेकांचे प्रसिद्धीपत्रक मतदारांच्या दारा दारात पडू लागले आहेत. इच्छुक उमेदवारांचे पत्रक वाटण्यासाठी अनेक ठिकाणी लहान लहान मुले प्रसिद्धी पत्रक मतदारांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी कामाला लावले आहेत. मात्र अनेक ठिकाणी हे प्रसिद्धी पत्रके दाराच्या कडीला अथवा कंपाऊंड मध्ये टाकून जातात एकाच घरात ददहा बारा पत्रके टाकून ही मुले गायब होतात त्यामुळे नाहक मतदारांना त्रास होत आहे.

सध्या शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रीटची रस्त्यांची कामे सुरू आहेत.तर काही पूर्ण झाली आहेत.माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या निधीतून काही ठिकाणी कामे झाली आहेत.

सोशल मीडियावर तर सध्या रील चा एवढा मोठा मारा केला जातो त्यामुळे आता निवडणूक कधी होईल आणि हे रील कधी बंद होतील असंच मतदारांना वाटू लागले आहे.सध्या मतदारांच्या भेटीगाठी मतदारांची संवाद साधताना रिला काढण्यास महत्त्व दिले असल्यामुळे कार्यकर्त्यांपेक्षा रील कॅमेरामन या इच्छुक उमेदवारांच्या आगे मागे असतात त्यामुळे काही ठिकाणी मतदारांनाही संकोचल्यासारखे होते. अनेक ठिकाणी रिल काढल्यामुळे वादही झाले आहेत. त्यामुळे आता हे रील प्रचार थांबवा आणि खरंच काम करा अशीच म्हणण्याची वेळ मतदार राजाची उमेदवारांना असेल.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular