Homeराजकारणकहानी में और ट्विस्ट बाकी है... तीन वाजेपर्यंत होणार अनेक राजकीय घडामोडी...

कहानी में और ट्विस्ट बाकी है… तीन वाजेपर्यंत होणार अनेक राजकीय घडामोडी आणि भूकंप…

advertisement

अहिल्यानगर दिनांक 30 डिसेंबर

अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून आज दुपारी तीन वाजता अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे. तर अजूनही महाविकास आघाडी आणि महायुती मधील भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची चर्चा सुरू आहे.

Oplus_131072

शिवसेना शिंदे गटाने वेगळा लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर रात्रीतून अनेक घडामोडी झाल्या असून इतर पक्षातील अनेक इच्छुक उमेदवार आता शिवसेनेच्या संपर्कात आले आहेत.त्यामुळे प्रत्येक भागात प्रतिस्पर्ध्याच्या विरोधात तगडे उमेदवार देण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली आहे.

मात्र जरी शिवसेना वेगळे लढण्याचा निर्णय घेतला असला तरी आता काही ठिकाणी हा निर्णय इच्छुक उमेदवारांना घातक ठरणार असल्यामुळे ते वेगळा निर्णय घेण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे आज दुपारी तीन वाजेपर्यंत अनेक मोठ्या आणि धक्कादायक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता असून अचानकपणे वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार दुसऱ्या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular