अहिल्यानगर दिनांक 4 जानेवारी
अहिल्यानगर महापालिका निवडणूक प्रचार जोरदार सुरू झाला असून प्रभाग क्रमांक तीन क मधील महिला उमेदवार बोरकर गौरी अजिंक्य यांनी प्रचाराची चौथी फेरी पूर्ण केली असून प्रभाग क्रमांक तीन मधील एकमेव उमेदवार असा आहे की जो प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचला आहे.

गेल्या पाच वर्षात नगरसेवकाच्या माध्यमातून अजिंक्य बोरकर यांनी प्रभागातील सर्वच परिसरातील कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ठीक ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रोड, रस्त्याच्या कडेचे पेविंग ब्लॉक, ठिकठिकाणी असलेल्या ओपन स्पेस वर गार्डन, मोठ मोठे चौक सुशोभीकरण आणि सर्व सुख सुविधा देणारे आणि सर्व प्रभागाला परिचित असणारे अजिंक्य बोरकर यांनी गेल्या सहा महिन्यापासून निवडणुकीची तयारी सुरू केली होती. त्यांनी स्वतः आणि पत्नी गौरी अजिंक्य बोरकर यांनी प्रभागातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन केले होते आणि आता ते शेवटच्या टप्प्यात आले असून प्रभाग क्रमांक तीन मधील असा एकमेव चेहरा असेल जो प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचला आहे. कारण इतर उमेदवारांना उमेदवारी मिळेल का नाही या शंके मुळे त्यांनी मतदारांपर्यंत जाण्याचे टाळले होते. मात्र आपल्या कामाच्या जोरावर पुन्हा एकदा महानगरपालिकेत संधी मिळेल आणि मतदार राजा पर्यंत केलेले काम घेऊन पोहचावे लागेल असे नियोजन करून अजिंक्य बोरकर आणि गौरी बोरकर यांनी गेल्या सहा महिन्यापासून नियोजन करून प्रभागात ठिकठिकाणी आपल्या कामांसह मतदारांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे सध्या तरी गौरी अजिंक्य बोरकर यांनी प्रचारात आघाडी घेतल्यचे दिसून आले आहे. बाकी उमेदवार अद्यापही अंधारात चडपडत आहेत. काही उमेदवार तर प्रभाग क्रमांक तीन सोडून सहा मध्ये प्रचार करताना दिसून येत आहेत त्यामुळे उमेदवारांना अद्याप आपला पप्रभाग कोणता हे माहीत नसल्याचे यावरून दिसून आले आहे.





