अहिल्यानगर दिनांक 5 जानेवारी
प्रभाग क्रमांक तीन ड मधून अर्जुन मदान यांच्या अपक्ष उमेदवारीने निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला असून आमदार संग्राम जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून अर्जुन मदान यांची ओळख आहे. त्याचप्रमाणे गुलमोहर रोड परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून गणपती उत्सव आणि नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असतो. प्रभाग क्रमांक मधील एक परिचित चेहरा म्हणून अर्जुन मदन यांची उमेदवारी या निवडणुकीत भल्या भल्यांची डोकेदुखी ठरू शकते.त्यामुळे अर्जुन मदन यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे निवडणुकीत रंगत आली आहे.

प्रभागातील निवडणुकीचे गणिते पाहता अर्जुन मदान यांचा असलेला संपर्क आणि गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू असलेली सेवा यामुळे अपक्ष असूनही प्रचारात आघाडी घेऊन अर्जुन मदान यांनी निवडणुकीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विशेष म्हणजे त्यांना मिळालेले चिन्ह टॉर्च म्हणजेच बॅटरीच्या उजेडात ते प्रभागाचा विकास मतदारांना दाखवतील आणि विरोधकांना अंधारात पाठवण्यासाठी आपल्याला टॉर्च या चिन्हावर मतदान करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
गुलमोहर रोड परिसरात अनेक वर्ष वास्तव असलेले अर्जुन मदान हे तरुण आणि सुशिक्षित उमेदवार असून प्रभागातील समस्यांची त्यांना जाण असल्याने समस्या सोडवण्यासाठी मतदारांनी मतरुपी एकदा संधी देऊन पहावी असे आवाहन त्यांनी प्रभाग क्रमांक तीन मधील मतदारांना केले आहे. काम करण्यासाठी आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत अहोरात्र 24 तास उपलब्ध असलेला नगरसेवक प्रभाग वासियांना हवा असेल तर त्यांनी एकदा अपक्ष असलेल्या अर्जुन मदान यांना संधी देऊन एक बहुमूल्य मत द्यावे असे आवाहन मदान यांनी केले आहे.





