अहिल्यानगर दिनांक 13 जानेवारी
अहिल्यानगर नगर शहरातील महत्वाचे उपनगर असलेल्या केडगाव परिसरातील शाहू नगर, पाच गोडाऊन परिसर भूषण नगरचा भाग या परिसरात प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजपा– राष्ट्रवादी आरपीआय (आठवले) युतीच्या अधिकृत उमेदवारांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. युतीचे अधिकृत उमेदवार सुनिताताई महेंद्र कांबळे ,वर्षाताई सुजित काकडे, विजय मोहन पठारे आणि ज्ञानेश्वर (अमोल) शिवाजी येवले. यांच्या प्रचार फेऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

प्रचारादरम्यान स्थानिक,व्यापारी, उद्योजक तसेच नागरिकांच्या भेटी घेत सविस्तर संवाद साधण्यात आला. या संवादातून नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि प्रभागाच्या विकासाबाबतच्या सूचना जाणून घेण्यात आल्या. पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक, आरोग्यसेवा आणि व्यापारविकास या मुद्द्यांवर उमेदवारांनी ठोस भूमिका मांडत प्रत्येक प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याचा निर्धार व्यक्त केला.
प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस ,आरपीआय (आठवले) युतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. नागरिकांनीही विकासाच्या संकल्पाला साथ देत विश्वास व्यक्त केला असून, आगामी काळात प्रभागाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याची भावना व्यक्त होत आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात उमेदवारांना मिळणारा हा वाढता पाठिंबा विजयाचा मार्ग अधिक मजबूत करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, महानगरपालिकेसारख्या संस्थेत अर्थकारण, नियोजन, प्रशासन आणि विकासकामांचा सखोल अभ्यास असलेले प्रतिनिधी असणे गरजेचे आहे.
सुनिताताई महेंद्र कांबळे,वर्षाताई सुजित काकडे ,विजय मोहन पठारे,ज्ञानेश्वर (अमोल) शिवाजी येवले यांच्या सारखे अभ्यासू आणि कामाचा अनुभव असलेला उमेदवार मिळाल्याने प्रभागाच्या विकासाला निश्चित दिशा मिळेल, असा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत.
भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रभागातील जनतेच्या अपेक्षा ओळखून मनातले उमेदवार दिले असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. आता कमळ आणि घड्याळासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याची जबाबदारी मतदारांची आहे, असे आवाहन प्रचारादरम्यान करण्यात येत आहे.




