Homeराजकारणमहापालिकेच्या घवघवीत यशानंतर अहिल्यानगरला लवकरच लाल दिवा...खा. सुजय विखे पाटील

महापालिकेच्या घवघवीत यशानंतर अहिल्यानगरला लवकरच लाल दिवा…खा. सुजय विखे पाटील

advertisement

अहिल्यानगर दिनांक 19 जानेवारी

अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक ठरणार आहे. कारण या निवडणुकीत विरोधकांना क्लीन स्विफ देत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अपेक्षेपेक्षा जास्त बहुमत मिळवले आहे.

Oplus_131072

सुरुवातीपासूनच आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी पन्नास प्लस चा नारा दिला होता आणि घडलेही तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत 27 जागा घेऊन एक नंबरचा पक्ष ठरला असून त्या पाठोपाठ भारतीय जनता पक्षाने 25 जागा जिंकून नगर शहरात भाजपची पाळेमुळे आणखीन बळकट केले आहे. तर ज्या शिवसेनेने 25 वर्ष अहिल्यानगर शहरावर आणि महानगरपालिकेवर राज्य केले होते त्या उभाठा शिवसेनेला मात्र केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले तर शिवसेना शिंदे गटाने दहा जागा घेत लडखडत का होईना आपली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला भोपळाही फोडता आला नाही ही मोठी धक्कादायक बाब या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आली असून यामुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता पुढील काळात पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांचा पाया भक्कम करावा लागणार आहे.

निवडणूक संपल्यानंतर आज बंधन लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेण्यात आला निवडणुकीच्या काळात ज्यांनी ज्यांनी पक्षासाठी आणि निवडून येणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र कष्ट घेतले अशा सर्व कार्यकर्त्यांचा यावेळी आभार मानून सन्मान करण्यात आला.या मेळाव्याला आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी संबोधित केले. कार्यकर्ता हाच निवडणुकीचा यशाचा पाया असल्याचं यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितले तर अहिल्यानगर मध्ये मिळालेले घवघवीत यश आमदार संग्राम जगताप आणि पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमुळे मिळाले असल्याने लवकरच आमदार संग्राम जगताप यांच्या मंत्री पदासाठी आपण शब्द टाकू आणि लवकरच लाल दिवा अहिल्यानगर शहराला भेटेल असा शब्दही यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिला आहे.

तर निवडणुकीत सर्वकाही सुरुवातीपासूनच ठरलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भविष्यात होणाऱ्या निवडी या ठरलेल्या असल्यामुळे कुणीही कार्यकर्त्यांनी आग्रह धरू नये सर्वांना समान संधी दिली जाईल असे आश्वासन आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी दिले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular