Homeराजकारणमहाविकास आघाडीचा निश्चयनामा, शिंदे शिवसेनेचा भयमुक्त नगरचा नारा आणि केडगावातील कोतकर यांची...

महाविकास आघाडीचा निश्चयनामा, शिंदे शिवसेनेचा भयमुक्त नगरचा नारा आणि केडगावातील कोतकर यांची एन्ट्री मतदारांनी नाकारली…

advertisement

अहिल्यानगर दिनांक 21 जानेवारी

अहिल्यानगर महानगरपालिकेची रणधुमाळी आता थंड झाली असून या निवडणुकीत महाविकास आघाडी मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी तर शिवसेना म्हणजेच शिंदे गट हा स्वतंत्र लढला होता तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टीने युती करून या निवडणुकीत आपले उमेदवार उतरवले होते. तर केडगाव मधून भानुदास कोतकर यांनी ऐनवेळी अपक्ष पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरून केडगाव मधील दोन प्रभागात चांगलीच चुरस आणली होती.

Oplus_131072

निवडणुकीच्या सुरुवातीला जे चित्र दिसत होते ते चित्र निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मात्र फार वेगळे चित्र मतदारांनी समोर आणले आहे.

अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडीने निश्चयनामा सादर करून अहिल्यानगरसाठी पुढील ३० वर्षांचा दूरदर्शी विचार करून घेतलेला दृढ निश्चयाचा संकल्प मतदारांसमोर मांडला होता. सावेडी उपनगरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकासमोर महाविकास आघाडीने भव्य सभा घेऊन मतदारांनसमोर निश्चयनामा सादर केला होता.

तर शिवसेना शिंदे गटाने पुन्हा एकदा भयमुक्तीचा नारा देत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शहरात दहशत करत असल्याचा आरोप केला होता आणि ही दहशत मोडून काढण्यासाठी मतदारांनी शिवसेनेच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन करत भयमुक्तीचा नारा देऊन पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना उतरली होती.

केडगाव उपनगरामध्ये भानुदास कोतकर यांचे पुनरआगमन महानगरपालिकेच्या माध्यमातून होईल असे वाटत असतानाच त्यांनी सुरुवातीला भाजपच्या बैठकीला हजेरी लावून राजकारणात मोठा ट्विस्ट आणला होता मात्र निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेनेला सोबत घेण्याची चर्चाही सुरू असतानाच अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मात्र त्यांनी आपल्या समर्थकांना अपक्ष म्हणून मैदानात उतरवल्यामुळे नेमकं निवडणुकीत काय होणार याची चर्चा चांगलीच झडत होती. भानुदास कोतकर यांना मानणारा वर्ग केडगाव मध्ये आहे आणि अपक्ष उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील अशी अपेक्षा कोतकर समर्थकांना होती. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर भानुदास कोतकर यांनी उभा केलेले सर्व अपक्ष उमेदवार पराभूत झाले त्यामुळे केडगावात भानुदास कोतकर यांची राजकारणातील एन्ट्री पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.

अहिल्यानगर मधील सुरू असलेले सिमेंट काँक्रीटचे रोड, विविध चौकांचे सुशोभीकरण आणि प्रत्येक गल्लोगल्ली आणि उपनगरातील प्रत्येक कॉलनीमध्ये सुरू असलेले विकास कामे यामुळे मतदारांनी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे या निवडणुकीत सारथ्य करत असलेले माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या युतीला भरभरून मतदान करून त्यांच्या पारड्यात मोठे यश टाकले आहे. जवळपास 52 जागा मिळवत भाजपा राष्ट्रवादी युती हा महापालिकेत महाशक्ती म्हणून उदयास आली आहे.

भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी सुरुवातीपासूनच म्हणजे उमेदवार निवडण्यापासून प्रचारापर्यंत प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवले होते त्यामुळे अनेक प्रभागात बंडखोरी होऊनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आपला प्रचार सुरू ठेवला होता. निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सभा महत्त्वाची ठरली. तर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या प्रत्येक ठिकाणी चौकसभा या लक्षवेधी ठरल्या होत्या.

त्या उलट महाविकास आघाडीमध्ये काही ठिकाणी ऐन वेळेस उमेदवारांना तिकीट न मिळाल्याने इतर पक्षातून त्यांनी उमेदवारी केली पक्षांमध्ये नसलेला ताळमेळ आणि महाविकास आघाडी मधील कोणताही मोठा नेता अहिल्यानगर मध्ये प्रचाराला आला नाही. अपवाद वगळता मुकुंद नगर त्यामुळे उमेदवार स्वतःच्या ताकदीवरच उमेदवारी करून लढत होते. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ताकद दिली असली तरी ती ताकद कुठेतरी कमी पडत होती. तर शिवसेनेमध्ये पदाधिकारीच निवडणुका उभे असल्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांची सभा वगळता कोणताही नेता नगर मध्ये प्रचाराला आला नाही आणि पदाधिकारी आपल्याच प्रभागात निवडणूक लढत असल्यामुळे ते त्याच ठिकाणी अडकून पडले आणि जे दहा उमेदवार निवडून आले त्यांनी स्वतःच याठिकाणी प्रचार करून त्यांच्या संपर्क आणि कामांमुळे ते पुन्हा महापालिकेत निवडून आले आहेत.

या निवडणुकीत महाविकास आघाडी मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एका जागेवर तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खातेही खोलता आले नाही. काँग्रेस मुकुंद नगर भागातील चार नंबर प्रभागामध्ये जिवंत राहिले असून इतर ठिकाणी त्यांचा प्रभाव कुठेही जाणवला नाही तर केडगाव मध्ये चारही उमेदवार पराभूत झाल्यामुळे भानुदास कोतकर त्यांचे अस्तित्व त्या ठिकाणी कमी पडले असेच म्हणता येईल मात्र विकासाच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने टाकलेले पाऊल मतदारांनी ओळखले असून त्यांनी या युतीला भरघोस मतदान करून महाविकास आघाडीचा निश्चयनामा, शिंदे शिवसेनेचा भयमुक्त नगरचा नारा आणि केडगावातील कोतकर यांची एन्ट्री मतदारांनी नाकारली असेच म्हणता येईल.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular