Homeजिल्हामतदार ओळखपत्र - आधारकार्डशी लिंक करण्याचे आवाहन, कसे कराल लिंक पहा

मतदार ओळखपत्र – आधारकार्डशी लिंक करण्याचे आवाहन, कसे कराल लिंक पहा

advertisement

अहमदनगर, दि.२३ ऑगस्ट

अहमदनगर शहर व तालुक्यातील मतदारांनी आपल्या मतदार ओळखपत्र आधारकार्डशी लिंक करून घ्यावे. असे आवाहन अहमदनगर तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी उमेश पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदाराचे आधारकार्ड मतदार ओळखपत्राशी लिंक (जोडणे) करण्याचा कार्यक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. व्होटर हेल्प लाईन (Voter Helpline App) किंवा www.nvsp.in या संकेतस्थळावरून मतदार ओळखपत्र आधारकार्डशी विनामूल्य लिंक करता येणार आहे. त्याशिवाय केंद्रस्तरीय मतदान अधिकारी (बीएलओ), तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल, सीएससी केंद्र, आपले सेवा केंद्र, महा ई-सेवा केंद्र, ग्रामपंचायत संगणक ऑपरेटर यांच्याशी संपर्क साधून मतदान ओळखपत्र आधारकार्ड विनामूल्य लिंक करता येणार आहे.

नागरिकांना स्वत: च्या स्मार्ट फोन मधून मतदारकार्ड-आधार लिंक करता येणार आहे. ‘गुगल प्ले स्टोअर’ वरून ‘व्होटर हेल्पलाईन ॲप’ मोबाईल मध्ये स्थापित केल्यानंतर ‘व्होटर रजिस्ट्रेशन’ या बटणावर क्लिक करून ‘फॉर्म ६ब’ निवडून त्यानंतर ‘लेटस स्टार्ट क्लिक’ करून आपला मोबाईल नंबर टाकून ‘व्हेरीफॉय’ करून घ्यावा. त्यानंतर आपले मतदान कार्ड नंबर व राज्य नमूद करून पुढे जावे. त्यानंतर आपल्या ओळखपत्राची माहिती दिसेल त्यात आपल्या आधार क्रमांक टाकायला जागा दिसेल तेथे आधार नंबर टाकावा व मोबाईल नंबर, गावाचे नाव टाकावे व ‘डन’ बटणावर क्‍लिक करावे. शेवटी आपण भरलेल्या फॉर्म ची संपूर्ण माहिती दिसल्यावर सबमीट बटणावर क्लिक केल्यानंतर हिरव्या रंगामध्ये ‘सक्सेस’ संदेश दिसेल. त्यानंतर आपण सबमीट केलेल्या अर्जाचा ‘रेफरन्स’ नंबर येईल. म्हणजे आपली मतदार व आधारकार्ड लिंकची माहिती भरून पूर्ण झाली आहे. असे दर्शवतो. असेही उमेश पाटील यांनी सांगितले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular