अहिल्यानगर दिनांक 17 नोव्हेंबर
विधानसभा निवडणूक आता दोन दिवसांवर येऊन ठेपली असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी लक्ष्मी दर्शन देण्याचे काम सुरू झाले आहे. नगर शहर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवारांचे दोन प्रतिनिधी तारकपूर भागात पैसे वाटप करत असताना तेथील स्थानिक नागरिकांनी रांगेहात पकडले आहेत.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांना संपर्क साधून दोन कार्यकर्त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात केले आहे अशी माहिती हाती आली असून निवडणुकीच्या आधी दोन दिवस मतदारांना भुलवण्यासाठी लक्ष्मी दर्शन सुरू झाले असल्याची चर्चा मात्र जोरात सुरू आहे.
एकीकडे विकासावर आणि प्रगतीसाठी मतदान करा असे भाषणात सांगायचे आणि मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांना भुलवण्यासाठी पैसे वाटप करायाचे असे प्रकार आता सुरू झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता योग्य निर्णय घेऊन विकासाला मत देणे गरजेचे आहे. तारकपूर भागात पकडलेल्या दोन कार्यकर्त्यांनकडून काही रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे नेमकी ही रक्कम कशासाठी आणली याची शहानिशा आता तोफखाना पोलीस करीत आहेत. तर तारकपूर भागातील स्थानिक नागरक हे पैसे मतदान करण्यासाठी वाटण्यासाठी आणले असल्याची माहिती देत आहेत.