Homeराजकारणमाजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या विकासाच्या व्हिजनवर...

माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या विकासाच्या व्हिजनवर आणि चारही नगरसेवकांच्या कामावर प्रभाग क्रमांक दोन मधील मतदारांचा शिक्कामोर्तब…

advertisement

अहिल्यानगर दिनांक १७ जानेवारी

प्रभाग क्रमांक एक आणि दोन या प्रभागात निवडणूक म्हणजे फक्त औपचारिकता होती असंच सुरुवातीपासून चित्र होते कारण या प्रभागात आमदार संग्राम जगताप आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून झालेले विकास कामे यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप पक्षाकडून कोण उभे राहणार याची उत्सुकता होती. कारण काही दिवसांपूर्वी निखिल वारे हे भाजपमध्ये गेल्यामुळे एक जागा भाजपला निश्चित होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब पवार,माजी नगरसेवक महेश तवले आणि सुनील त्रंबके यांची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. तर शेवटच्या क्षणी विनीत पाऊलबुद्धे यांनी निवडणूक लढवणार नाही अशी भूमिका घेतल्याने त्यांच्या जागी कोण असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते.मात्र माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी केलेले उत्तम नियोजन आणि प्रभागातील उमेदवारांची घातलेली सांगड आणि त्यांना कार्यकर्त्यांची आणि मतदारांची मिळालेली साथ यामुळे ही निवडणूक सुरुवातीपासूनच एकतर्फी झाली होती. प्रतिस्पर्धी उमेदवारांना तगडे उमेदवार मिळाले नसल्याने ही निवडणूक म्हणजे एक औपचारिकता होती.

Oplus_131072

विविध समाज आणि विविध घटकांचा प्रभाग क्रमांक दोन हा विस्तारलेला असल्यामुळे या ठिकाणी उत्तम नियोजन करणे गरजेचे होते आणि या सर्वांना बरोबर घेऊन चारही उमेदवारांनी आपला विजय निश्चित केला होता.

या प्रभागात खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी दिलेल्या भरघोस विकास निधीमुळे झालेली विकास कामे चारही नगरसेवकांचा समन्वय त्यांना प्रचारामध्ये लाभलेली कार्यकर्त्यांची साथ नियोजनबद्ध प्रचार आणि मतदारांनी आमदार संग्राम जगताप खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर टाकलेला विश्वास यामुळे चारही उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहेत.
या पॅनलमध्ये महेश तवले हे माजी नगरसेवक होते त्यांच्या काळात त्यांनी केलेला विकास कामही या निवडणुकीत त्यांच्या कामी आला. तर त्यांना इतर नगरसेवकांचीही मोठी साथ लाभली.

चारही नगरसेवकांकडून या प्रभागात मोठ्या प्रमाणात कामे होतील अशीच अपेक्षा प्रभाग क्रमांक दोन मधील मतदारांनी व्यक्त केली आहे. केंद्रात राज्यात आणि अहिल्यानगर महानगरपालिकेत या समविचारी पक्षांची सत्ता आल्यामुळे आता प्रभाग क्रमांक दोन चा विकास दुपटीने वेगात होईल असा विश्वास नवनिर्वाचित नगरसेवकांनी व्यक्त केला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular