अहमदनगर दि.३० सप्टेंबर
अहमदनगर शहरातील गुलमोहर रोड वरील आनंदनगर शाळेसमोर असलेल्या नवरात्र उत्सव मंडळाच्या समोर गुरुवारी रात्री एका बारा वर्षे मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून हा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या ठिकाणी त्या मुलाला लाईटचा शॉक बसल्याने मृत्यू झाल्याचं चर्चा सुरू आहे तर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्या मुलाला फिट आली असल्यामुळे त्याला दवाखान्यात दाखल केलं होतं अशी माहिती दिली होती. मात्र या ठिकाणी मंडळाच्या समोर असलेल्या मोठ्या डीपीतनं आकडा टाकून लाईट घेतली असल्याचे विजवीतरण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास
आले असून वीज वितरण कंपनीकडून(electricity distribution officials)अधिकृत मीटर घेतल्या नंतरही मोठ्या डीपीतुन आकडा टाकून मंडपा बाहेरील कमानीवर लावलेल्या लाईट साठी वीज घेतली गेली होती. या ठिकाणी उघड्या वायरी ठेवल्यामुळे या लहान मुलाचा शॉक असून अपघाती मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे.
रात्री उशिरा या ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेऊन स्थळाची पाहणी केली होती.त्यानंतर आज सकाळी पुन्हा महावितरण कंपनीचे (electricity distribution company, )वरिष्ठ अधिकारी यांनी येऊन पाहणी केली आहे. तसेच या ठिकाणी जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. तोफखाना पोलिसांनी या ठिकाणी पंचनामा केला असून पोलीस आता रोहित जगधने याच्या पोस्टमार्टम रिपोर्ट साठी वाट पाहणार असून त्यानंतर नेमका मृत्यू कशामुळे झाला याचे कारण स्पष्ट झाल्या नंतर पुढील कारवाई करणार आहेत.