Homeविशेषनगर शहरातील नागरिकांसाठी किरण वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना, माजी मंत्री थोरातांच्या हस्ते...

नगर शहरातील नागरिकांसाठी किरण वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना, माजी मंत्री थोरातांच्या हस्ते लॉन्चिंग ;माय नगर फाउंडेशन व किरण काळे युथ फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

advertisement

अहमदनगर दि.२० सप्टेंबर

सर्वसामान्य नागरिकांना अनेक वेळा वैद्यकीय खर्च न परवडणारा असतो. अचानक आरोग्य विषयक मोठ्या समस्या उद्भवतात. शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते. अशावेळी आर्थिक अडचणीमुळे रुग्ण व नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा नागरिकांना मदत करण्यासाठी व दिलासा देण्यासाठी माय नगर फाउंडेशन व किरण काळे युथ फाऊंडेशनच्या वतीने वैद्यकीय मदत करण्यासाठी “किरण वैद्यकीय मदत कक्षाची” स्थापना करण्यात आली असून माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नुकतेच या कक्षाचे लॉन्चिंग करण्यात आले आहे.

माजी मंत्री थोरात यांचा नुकताच नगर शहर दौरा झाला. यावेळी या उपक्रमाची घोषणा फाउंडेशनने करत कक्षाचे लॉन्चिंग केले. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची विशेष उपस्थिती होती. काळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम नगर शहरातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आला आहे.

आ. थोरात म्हणाले की, काळे हे नेहमीच शहरातील सर्व घटकांच्या मदतीला धावून जात असतात. त्यांच्याच नावाने सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या वैद्यकीय मदत कक्षातून अनेकांना मोठा आधार मिळणार आहे. ही जनसेवा आहे. राजकारणात असून देखील सामाजिक कार्य करण्याचा त्यांचा मूळ पिंड आहे. नगर शहरातील नागरिकांसाठी किरण वैद्यकीय मदत कक्ष हा अडचणीच्या काळात निश्चित मोठा आधार देण्याचे काम करेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

फाउंडेशनच्या उपक्रमाची माहिती देताना मदत कक्षाचे समन्वयक प्रवीण गीते म्हणाले की, हा मदत कक्ष वर्षाचे ३६५ दिवस २४ तास शहरातली नागरिकांसाठी वैद्यकीय मदत करेल. पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना या माध्यमातून बहुतांशी सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करून देण्यासाठी सहकार्य केले जाईल. शासनाच्या विविध वैद्यकीय योजना तसेच मुख्यमंत्री, पंतप्रधान वैद्यकीय योजना तसेच विविध धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी कक्ष काम करेल.

बऱ्याचदा रुग्णा व नातेवाईक हॉस्पिटल मधील उपचार, शस्त्रक्रिया झाल्यानंतर मोठ्या बिलाची रक्कम समोर आल्यावर मदतीसाठी संपर्क साधत असतात. मात्र अशावेळी इच्छा असूनही मोठी मदत करण्याला अनेक मर्यादा पडतात. त्यामुळे गरजू नागरिकांनी आपला रुग्ण एखाद्या आजाराच्या उपचार अथवा शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यापूर्वीच किरण कक्षाशी संपर्क साधावा. जेणेकरून त्याला जास्तीत जास्त मदत करणे शक्य होऊ शकेल. यासाठी मदत पक्षाच्या 8698757068 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन माय नगर फाउंडेशन व किरण काळे युथ फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

आ. डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, फाउंडेशनचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. नगर शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त किरण कक्षाचा लाभ घेतला पाहिजे. काळे यांनी जनसेवेचे घेतलेले व्रत हे समाजातील गोरगरिबांचे अश्रू पुसणारे आहे. आ. लहू कानडे म्हणाले की, वैद्यकीय अडचणींमुळे अचानक मोठया आर्थिक संकटांना नागरिकांना सामोरे जावे लागणाऱ्या गरजूंना किरण वैद्यकीय मदत कक्षाचा मदतीचा हात हा अनेकांना दिलासा देणारा ठरेल.

यावेळी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले, महिला जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, माजी नगरसेवक फैयाज शेख, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते पाटील, अल्पसंख्यांक काँग्रेसचे अनिस चुडीवाला, सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, सावेडी विभाग प्रमुख अभिनय गायकवाड, हनीफ शेख, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, गणेश आपरे, मोहनराव वाखुरे, इम्रान बागवान, निजाम जहागीरदार, इंजि. सुजित क्षेत्रे, संतोष जाधव, पै. दीपक जपकर, मनोज वाळके, रितिक जाधव, आकाश आल्हाट, गौरव जाधव फाउंडेशनचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular