HomeUncategorizedजातीय तेढ निर्माण करणाऱ्या युट्युब चॅनेलच्या मालक आणि निवेदकला अटक,महोत्सव सुरू ठेवण्या...

जातीय तेढ निर्माण करणाऱ्या युट्युब चॅनेलच्या मालक आणि निवेदकला अटक,महोत्सव सुरू ठेवण्या करिता दोन लाखाची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांवर गुन्हा दाखल तर घोटाळा झाल्याच्या पोस्ट टाकून बँकेची बदनामी करून दोन कोटींची खंडणी मागणाऱ्या पत्रकारावर गुन्हा दाखल

advertisement

महाराष्ट्र दि.२४ एप्रिल
धार्मिक-जातीय तेढ निर्माण करणारा व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने तहफुज-ए-दिन इंडिया या युट्युब चॅनेलचा मालक व अँकरला अटक केली आहे. या दोघा आरोपींना २५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी शनिवारी दिले.

जीयाउर रहमान महफुजुर रहमान फारुकी (रा. भडकलगेट,टाऊन हॉल) असे मालक तर सय्यद.फारुख अहेमद (रा. सादातनगर,रेल्वे स्टेशन) असे अटक करण्यात आलेल्या अँकरचे नाव आहे. सायबर पोलिस ठाण्याच्या सोशल मिडीया सेलचे उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चॅनलचा अँकर
व मालक यांच्याविरुध्द १५३ (अ), ५०५ (ब), ५०५ (क)
व ३४ प्रमाणे बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खंडणीखोरांवर खोपोलीत गुन्हा
महोत्सव सुरू ठेवण्यासाठी आयोजकांकडे दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या मेहबूब जमादार, तय्यब खान, आकाश जाधव आणि शेखर परब (रा. खोपोली) यांच्याविरोधात खोपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोपोली महोत्सव’ नावाने जत्रा भरवण्यात आली होती. त्याचे आयोजक रमण सावंत आणि मोहसीन (रा. कृष्णानगर) हे होते. महोत्सव सुरू ठेवण्यासाठी चौघांनी दोन लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. आयोजकांनी नकार दिला असता खोपोली महोत्सव बंद पाडण्याची व त्यामध्ये अडथळे आणण्याची धमकी दिली. त्यानंतर तडजोड होऊन एक लाख ५० हजार रुपये या रकमेवर समेट झाली. या प्रकरणी आयोजकांनी चौघांविरोधात खोपोली ठाण्यात तक्रार दिली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.

घोटाळा झाल्याच्या पोस्ट टाकून बँकेची बदनामी आणि खंडणीची मागणी

जाधवमंडी येथील अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत कार्यरत असताना महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेऊन बँकेत घोटाळा झाल्याचा आरोप करीत बडतर्फ व्यवस्थापकाने दोन कोटी रुपये खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी बँकेच्यावतीने सिटी चौक पोलीस ठाण्यात बडतर्फ व्यवस्थापकासह तोतया पत्रकारावर गुन्हा नोंदविला. बडतर्फ बँक व्यवस्थापक नितीन जमनादास भाटिया (वय ५३, रा. देशमुखनगर, शिवाजीनगर) आणि तोतया पत्रकार राजू राठोड अशी
आरोपींची नावे आहेत. घोटाळा झाल्याच्या पोस्ट टाकून बँकेची बदनामी केली. यानंतर आरोपी तोतया पत्रकार राजू राठोड यास  तक्रारदारांकडे पाठवून बँकेत घोटाळा झाल्याचा आरोप करीत कागदपत्रांच्याआधारे वर्तमानपत्रात बातमी प्रकाशित न करण्यासाठी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. हा प्रकार ११ डिसेंबर २०१७ ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलंय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular