HomeUncategorizedमहसूल मंत्र्यांच्या आदेशा नंतरही अवैध वाळू तस्करी सुरूच महसूल खात्याचे दुर्लक्ष पोलिसांनी...

महसूल मंत्र्यांच्या आदेशा नंतरही अवैध वाळू तस्करी सुरूच महसूल खात्याचे दुर्लक्ष पोलिसांनी केली मोठी कारवाई अवैध वाळू उत्खनन करणारा जेसीबी, डंपरसह दोन आरोपी जेरबंद

advertisement

शेवगाव दि.११ नोव्हेंबर

एकीकडे अवैध वाळू उत्खननाच्या विरोधात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कडक पाऊल उचलले होते यापुढे अवैद्य वाळू खनन होत असल्यास त्या ठिकाणच्या तहसीलदार आणि तलाठ्यावर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले होते मात्र अवैध वाळू वाहतूकदारांनी महसूल विभागाच्या नाकावर टिचून उत्खनन सुरू झाले होते मात्र पोलिसांनी छापा टाकून तीन आरोपींसह 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांना मिळालेल्या माहिती नुसार शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथील नानी नदीपात्रातून चोरून वाळू वाहतूक सुरू होती त्या ठिकाणी छापा टाकून  अश्पाक सुलेमानं शेख याच्या ताब्यातून एक जे.सी.बी. एकूण 20,00,000/- रुपयांचा आणि आरोपी गणेश चंद्रकांत केदार याचे ताब्यातून एक डम्पर व 3 ब्रास वाळू असा आकाशी 6,15,000/- रुपयांचा मुद्देमाल असा एकूण 26,15000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या आरोपी विरुध्द सचिन काकडे यांचे फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन येथे गु. भा द वि कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक राकेश  ओला,अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,Dysp संदीप मिटके, यांचे मार्गदर्शनाखाली 𝙿𝚜𝚒 भाटेवाल , HC सुरेश औटी, PC नितीन शिरसाठ, नितीन चव्हाण, सचिन काकडे,विलास उकीर्डे आदींनी केली.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular