Homeशहरउप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अपघाताबाबत सर्वांचे मौन... त्या कार्यालयात "उबे" ची चांगलीच...

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अपघाताबाबत सर्वांचे मौन… त्या कार्यालयात “उबे” ची चांगलीच चलती… तो खाजगी इसम का सरकारी कर्मचारी….

advertisement

अहमदनगर दि.२३ सप्टेंबर

अहमदनगर शहरात गुरुवारी उप प्रादेशिक परिवाहन कार्यालयाच्या (Sub-Regional Transport Office) परिसरात एक अपघात होऊन या अपघातात एका तरुण अधिकाऱ्याच्या हाताचे हाड मोडले आहे. दुसऱ्या अधिकाऱ्याने (officer) या अधिकाऱ्याला गाडी तपासणी दरम्यान दिलेल्या धडके मध्ये हा अपघात(accedent ) झाला आहे. विशेष म्हणजे यामध्ये अपघात झालेला अधिकारी आणि गाडी तपासणी करणारा अधिकारी या दोन्ही अधिकाऱ्यांची या ठिकाणी ड्युटी नसताना ते ड्युटी बजावत होते. अशी माहिती समोर येतेय. यानंतर त्या अधिकाऱ्याला शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मात्र वरिष्ठ अधिकारी किरकोळ अपघात असल्याचे माहिती प्रसार माध्यमांना देत असून या अपघाता आधी दोन दिवसांपूर्वी तपासणी दरम्यान एका तपासणी अधिकार्‍याकडून एक गाडी रोडच्या असलेल्या साईड गटार मध्ये जाऊन पलटी झाली होती. त्याबाबतही कुठेही वाच्यता करण्यात आली नाही. आणि कालच्या अपघातानंतरही अपघात ग्रस्त गाडी ही तातडीने कार्यालयाच्या बाहेर काढून देण्यात आलीय. याप्रकरणी अध्यापही पोलीस स्टेशनला कोणता गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही हे विशेष.

हा प्रकार होत असतानाच या उपप्रादेशिक परिवहन कार्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यावेळेस परवानाधारक वाहनांची पासिंग होत असताना या ठिकाणी आरटीओच्या अधिकाऱ्यांबरोबर एक खाजगी “उबे” नावाचा इसम अधिकाऱ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून उभा असतो. सरकारी अधिकारी अथवा कर्मचारी आहे का हा प्रश्न निर्माण होतो. कारण अधिकाऱ्यांच्या बरोबरच हा त्या ठिकाणी काम करताना आढळून येतो. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व सीसीटीवी तपासणी केले तर “उबे” चा वापर थेट अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत होत आहे. त्यामुळे “उबे” अधिकारांसाठी कोणते काम करतो आणि त्याला हे काम करण्यासाठी कोण प्रोत्साहन देत याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात चांगली चर्चा ऐकायला मिळत आहे. “उबे” च्या माध्यमातून अर्थकारण मोठ्या प्रमाणावर होत असून परवानाधारक वाहन तपासण्यासाठी आल्यानंतर काही ठराविक रक्कम या वाहन धारकांकडून घेत असल्याची चर्चा या ठिकाणी वाहनधारकांनी बरोबर बोलताना पुढे आली. या “उबे” ला नेमकं कोणाचं अभय आहे . “उबे” हा सरकारी कर्मचारी नसताना अधिकाऱ्यांबरोबर त्या कामाच्या ठिकाणी वावरतोच कसा ? असे एक ना अनेक प्रश्न समोर येत असून या “उबे” चे अनेक कारनामे आता समोर येऊ लागले आहेत. (क्रमशः)

पुढील भागात “उबे” चे कारनामे.. अनफीट अधिकारी ड्युटीवर कसा ?

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular

20:54