अहिल्यानगर दि.6 डिसेंबर
विधानसभा निवडणूक झाली आणि निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला तर महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. मात्र यानंतर ईव्हीएम मशीन बाबत अनेकांनी संशय व्यक्त करून पुन्हा मतमोजणीचे आणि ईव्हीएम पडताळणीची मागणी केली महाराष्ट्र राज्यातून 31 जिल्हयांतील एकूण 95 विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम- व्हीव्हीपॅट मशिन्सच्या Burnt memory / microcontroller च्या तपासणी आणि पडताळणीसंदर्भात एकूण 104 अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाले.या 104 अर्जांमधून महाराष्ट्र राज्यातील 1,00,486 मतदानकेंद्रापैकी 755 मतदानकेंद्रावरील ईव्हीएम संचाची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघाच्या पराभूत उमेदवार राणी लंके, राहुरी नगर मतदारसंघाचे प्राजक्त तनपुरे, कर्जत जामखेड मतदारसंघाचे राम शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे पैसे भरून ईव्हीएम पडताळणीची मागणी केली आहे.
भारत निवडणूक आयोगाने आता ईव्हीएम – व्हीव्हीपॅट मशिन्सच्या Burnt memory / Microcontroller च्या तपासणी आणि पडताळणीसंदर्भात एक परिपत्रक जारी केले असून यामध्ये कशाप्रकारे पडताळणी होणार आहे याची माहिती दिली आहे.
ज्या उमेदवारांनी evm पडताळणीचा अर्ज केला आहे त्या उमेदवारांनी जर ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या Burnt memory / microcontroller च्या तपासणी आणि पडताळणीसंदर्भात उत्पादक कंपनीकडून तपासणीच्या तारखेआधी 3 दिवस पर्यंत अर्जदार त्यांचा तपासणीचा अर्ज कोणत्याही वेळी मागे घेऊ शकतो. त्यानुसार संबंधित अर्जदारास त्याने जमा केलेले शुल्क त्यांना परत करण्याची तरतूद आहे.
अशी पार पाडली जाणार प्रक्रिया
ईव्हीएम- व्हीव्हीपॅट मशिन्सच्या Burnt memory / microcontroller च्या तपासणी आणि
पडताळणीदरम्यान निवडणूक याचिका दाखल नसलेल्या प्रकरणी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी पार पडलेली प्रक्रिया पुन:श्च पार पाडली जाते. त्यानुसार, ईव्हीएम- व्हीव्हीपॅटच्या संचातील प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचा डेटा क्लियर करण्यात येऊन अभिरुप मतदान (मॉकपोल) घेण्यात येते. अंतिमतः सीयु मधील डेटा व व्हीव्हीपॅट मशिन्स मधील स्लीप्स यांच्या आकडेवारीमध्ये तफावतीबाबत निरीक्षण करण्यात येते. त्यावरुन संबंधित संचातील ईव्हीएमचे कामकाज व्यवस्थित असल्याची खात्री करण्यात येते.