HomeUncategorizedकेंद्रीय मंत्र्यापासून राज्यातील आजी माजी मंत्री खासदार आमदारांकडे लाखो रुपयांची वीजबिल थकबाकी...

केंद्रीय मंत्र्यापासून राज्यातील आजी माजी मंत्री खासदार आमदारांकडे लाखो रुपयांची वीजबिल थकबाकी पहा कोण आहेत ते थकबाकीदार मंत्री

advertisement

मुंबई दि.७ मे
ऊर्जा विभागाकडून  राज्यातील थकित वीजबिलांची यादी  जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. उर्जा विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये राज्यातील अनेक नेत्यांच्या नावावर लाखो रुपयांचे वीजबिल थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या यादीमध्ये फक्त महाविकास आघाडीचे नेतेच नाही तर इतर पक्षांच्या नेत्यांच्या नावाचा समावेश आहे.

राज्यातील सर्वसामान्यांचे वीजबिल थकबाकी राहिल्यानंतर त्यांच्याविरोधात थेट कारवाई केली जाते आणि वीजेचे कनेक्शन कट केले जाते. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिलावरुन देखील कारवाई केली जाते. अशामद्ये राज्यातील लोकप्रतिनिधी असे आहेत ज्यांनी स्वत:च लाखो रुपयांचे वीजबिल भरले नाहीत. या लोकप्रतिनिधींकडून लाखो रुपयांची वीजबिलाची थकबाकी कशा पद्धतीने वसूल करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

30 एप्रिल 2022 पर्यंत राज्यातील आमदार-खासदार आणि मंत्री असे एकूण 372 ग्राहकांची 1 कोटी 27 लाखांचे वीजबिल थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऊर्जा विभागाने जाहीर केलेल्या यादीमध्ये राज्यातील नेत्यांची नावे पहा

आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे आमदार बंधू संजय शिंदे आणि कुटुंबियांची तब्बल 22 विज जोडणीतील तब्बल – 7 लाख 86 हजार रुपये थकबाकी
– भाजप आमदार जयकुमार गोरे- 7 लाख रुपये थकबाकी
– आरोग्यमंत्री राजेश टोपे – 4 लाख रुपये थकबाकी
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात – 10 हजार रुपये थकबाकी
– काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले – 2 लाख 63 हजार रुपये थकबाकी
राज्यमंत्री विश्वजीत कदम – 20 हजार रुपये थकबाकी- – श्रीमंत युवराज संभाजीराजे – 1 लाख 25 हजार 934 रुपये थकबाकी
– माजी मंत्री सुभाष देशमुख- 60 हजार रुपये थकबाकी ( नावावर तीन वीज कनेक्शन )
माजी गृहमंत्री अनिल देशमुख – 2 लाख 25 हजार थकबाकी
– केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे – 70 हजार रूपये थकबाकी
– आमदार समाधान आवताडे – 20 हजार रुपये थकबाकी
– आमदार राजेंद्र राऊत (बार्शी) – 3 लाख 53 हजार रूपये थकबाकी

खासदार रणजितसिंह निंबाळकर- (चार विज जोडणी) ३ लाख रुपये थकबाकी
– आमदार संग्राम थोपटे- ( चार विज जोडणी) 1 लाख रुपये थकबाकी
– माजी खासदार प्रतापराव जाधव – 1 लाख 50 हजार रुपये थकबाकी
– शिवसेना आमदार सुहास कांदे – 50 हजार रुपये थकबाकी
– आमदार रवी राणा – 40 हजार रुपये थकबाकी
– आमदार वैभव नाईक – 2 लाख 80 हजार रुपये थकबाकी
– माजी मंत्री विजयकुमार गावित- 42 हजार रुपये थकबाकी
– माजी आमदार शिरीष चौधरी – 70 हजार रुपये थकबाकी
– मंत्री संदीपान भुमरे – 1 लाख 50 हजार रुपये थकबाकी
– खासदार रजनीताई पाटील – 3 लाख रुपये थकबाकी
– आमदार प्रकाश सोळंके – 80 हजार रुपये थकबाकी
– आमदार संदीप क्षीरसागर – 2 लाख 30 हजार रुपये थकबाकी
– राज्यमंत्री संजय बनसोडे – 50 हजार रुपये थकबाकी
– आमदार अशिष जयस्वाल – 3 लाख 36 हजार रुपये थकबाकी
– आमदार महेश शिंदे -70 हजार रुपये थकबाकी
– माजी मंत्री सुरेश खाडे – 1 लाख 32 हजार रुपये थकबाकी
– सुमन सदाशिव खोत – 1 लाख 32 हजार 435 रुपये थकबाकी

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular